दिनदर्शिका वापराबाबत शिक्षकांसाठी सूचना
१)शैक्षणिक दिनदर्शिका सर्व शिक्षकांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी.
२) शैक्षणिक दिनदर्शिका विद्यार्थ्यांनी वापरायला सुरू करण्यापूर्वी शिक्षकांनी सर्व वापरकर्त्या विद्यार्थ्यांशी व पालकांशी फोन, व्हिडिओ कॉल, ग्रुप कॉल, कॉन्फरन्स कॉल करून संवाद साधावा आणि शैक्षणिक दिनदर्शिका वापरून अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करावे.
३)वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना फक्त अभ्यास बद्दल बोलू नये हा संवाद अनौपचारिक असावा. विद्यार्थी, कुटुंब, सध्याची दिनचर्या व घरात सध्या स्वीकारलेली जबाबदारी, आजूबाजूच्या परिस्थितीबाबत त्याचे मत याबद्दल चर्चा करून शिक्षक विद्यार्थ्यांची संबंध दृढ होतील याची काळजी घ्यावी.
४) वर्ग शिक्षकांनी विषयशिक्षकांनी पाठ शिकवताना पुस्तकाचा कसा वापर करावा याबद्दल सूचना द्याव्यात.
५)प्रत्येक पाठाचे ई-साहित्य बघण्यापूर्वी व बघितल्यानंतर काय करावे याबद्दल ही विद्यार्थ्यांना सांगावे.
६) त्याचप्रमाणे पाठातील ई साहित्याशी संबंधित समांतर उपक्रम आणि स्वाध्याय या बद्दल विद्यार्थ्यांची संवाद साधावा.
७) नियमित अभ्यास पर्याय म्हणून आपण दीक्षा ॲप चा वापर आपण करत नाही आहोत तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर क्रियेतून जे विद्यार्थ्यांचे अध्ययन घडते त्याला पूरक साहित्य किंवा शैक्षणिक साहित्य म्हणून साहित्याचा वापर करणे अपेक्षित आहे.
८ ) शैक्षणिक दिनदर्शिके मध्ये देण्यात आलेल्या कृतीशिवाय शिक्षकांनी आपल्या स्तरावर इतर आवश्यक कृती व उपक्रम विद्यार्थ्यांना पुरविण्यास हरकत नाही.
0 Comments