आनापान ध्यान साधना प्रशिक्षण. इ. ५वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३१ जानेवारी २०२१ सकाळी ८ ते १०.
कोविडच्या काळामध्ये राज्यातील दोन लाखापेक्षा अधिक शिक्षकांनी स्वतःहून आनापान हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यामध्ये शिक्षकांनी अतिशय उत्तम प्रकारचे अभिप्राय नोंदवून आनापान साधनेची दैनंदिन जीवनात किती आवश्यकता आहे याचे महत्त्व विषद केलेले आहे.
वाचा - आनापान ध्यान साधना कशी केली जाते? आनापान करण्याचे फायदे कोणते?
वाचा - आनापान मित्र उपक्रमाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा.
आनापान साधनेची उपयुक्तता लक्षात घेवून राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील इ. ५ वी ते इ. १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आनापान साधनेचे प्रशिक्षण रविवार, दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ ते १० या वेळात दिले जाणार आहे. सदरचे प्रशिक्षण मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून होणार आहे. आपण आपल्या सोयीनुसार यापैकी कोणत्याही एका भाषेच्या प्रशिक्षणात संबंधित लिंक वापरून सहभागी होऊ शकता. यात पालक तसेच शिक्षकही सहभागी होऊ शकतात.
विद्यार्थ्यांनी आपापल्या घरीच या प्रशिक्षणात सहभागी व्हावे. प्रशिक्षणाला शक्यतो शांत, एका जागी जमिनीवर मांडी घालून बसावे.
मराठीतून प्रशिक्षणासाठी लिंक
https://youtu.be/4OnTMrjdTug
हिंदीतून प्रशिक्षणासाठी लिंक
https://youtu.be/07gzycVpQTc
इंग्रजीतून प्रशिक्षणासाठी लिंक
https://youtu.be/vTEFobwTzRM
मुख्याध्यापक व शिक्षकांना विनंती करण्यात येत आहे की, हा मेसेज सर्व विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचवावा. सर्व विद्यार्थी या प्रशिक्षणात सहभागी होतील असे नियोजन करावे.
2 Comments
This comment has been removed by the author.
ReplyDeleteWhat is this
ReplyDelete