Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

१ मार्चपासून स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार शाळा बंदचा निर्णय घ्यावा: वर्षा गायकवाड

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे १ मार्चपासून स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार शाळा बंदचा निर्णय घ्यावा असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आदेश दिले आहेत. 
राज्यात अनेक ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागातील इयत्ता पाचवीपासूनच्या शाळा सुरू होत्या. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण खूप वाढले आहे. काही शाळांतील शिक्षक व विद्यार्थी देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. 


देशातील व प्रामुख्याने राज्यातील वाढत असलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी लक्षात घेत शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी राज्यातील व काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थिती नुसार दिनांक १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहे. त्या संदर्भात ट्विटरद्वारे त्यांनी कळविले आहे.


विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे संबंधिताने आवश्यक ती काळजी घ्यावी असे ही त्यांनी म्हटले आहे. 


Post a Comment

0 Comments

close