कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यातील इ.५वी ते इ.९वी पर्यंत च्या शाळा २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत.
मागील आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णांचे प्रमाण खूप वाढत आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवसात 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच अकोला, वाशिम जिल्ह्यातही कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सामुहिक कार्यक्रमांना 50 व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 28 फेब्रुवारी पर्यंत ग्रामीण व शहरी भागातील शाळा बंद ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या इ.५वी ते इ.९वी पर्यंत च्या प्राथमिक / माध्यमिक शाळा, तसेच खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत.
सदर कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन वर्गाचे नियोजन करुन शैक्षणिक कार्य सुरु ठेवावे. ऑनलाईन वर्ग सुरु असले तरी शासन निर्णयानुसार 50% शिक्षकांनी शाळेमध्ये उपस्थित राहावयाचे आहे.
इ.५वी ते इ.९वी चे वर्ग बंद असले तरी दहावी बारावी चे वर्ग सुरु राहणार आहेत. हे वर्ग सुरु असताना कोरोना विषाणू च्या संदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मास्क व सॅनिटाइजर चा नियमित वापर करावा. दोन विद्यार्थ्यांमध्ये ६ फुट अंतर ठेवावे.
0 Comments