Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोविड लसीकरण ऑनलाईन रजिस्ट्रेशन / नाव नोंदणी कशी करावी❓ लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे ❓Step by Step Guide.. लसीकरण केंद्रात जाताना काय काळजी घ्यावी? पोशाख कसा असावा?

1 मे पासून 18 वर्षे वरील सर्वांना कोविड लस देण्यासाठीची नाव नोंदणी आजपासून सुरु झाली आहे. कोविड 19 लसीकरणाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन / नाव नोंदणी कशी करावी? याची माहिती आज आपण घेणार आहोत. 



कोरोना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु ॲपवर जावून रजिस्ट्रेशन करावे लागेल. 

1 मे पासून 18 वर्षे वरील सर्वांना कोविड लस दिली जाणार आहे. त्यासाठीची नोंदणी आजपासून सुरु झाली आहे. 18 वर्षे वरील सर्व नागरिकांनी लस घेण्यासाठी खालीलप्रमाणे नोंदणी करणे गरजेचे आहे. 

कोरोना लस (covid 19 vaccine) कुणी घ्यावी❓ आणि कुणी नाही❓... कोरोना लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पहा...

कोविड लसीकरण नाव नोंदणी / रजिस्ट्रेशन कसे करावे ❓ संपूर्ण मार्गदर्शक  Video पहा. 



कोविड लसीकरण नाव नोंदणी / रजिस्ट्रेशन असे करा. Step by Step Guide. 

Step 1 - नाव नोंदणी करण्यासाठी www.cowin.gov.in या वेबसाईटवर टच करा. किंवा डायरेक्ट रजिस्ट्रेशन लिंंक साठी येथे टच करा. Click Here

 Step 2 - Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.

Step 3 - जो मोबाईल क्रमांक रजिस्टर कराल त्या नंबरवर OTP येईल. तिथे टाका आणि Verify वर क्लिक करा.

Step 3 - Vaccine Registraction form दिसेल त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरा आणि Submit वर क्लिक करा.

Step 4 - तुम्ही vaccine साठी registraction केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.


Step 5 - त्यानंतर schedule appointment वर क्लिक करा. आणि त्यामध्ये तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पिन कोड टाका. पिनकोड माहिती नसेल तर मॅन्युअली राज्य, जिल्हा निवडू शकता. 

Step 6 - लसीकरणासाठी Session निवडा, सकाळचे किंवा दुपारचे.

Step 7 - Vaccin center आणि Date निवडा.

Step 8 - Appointment book करुन ती confirm करा.

Step 9 - Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

Step 10 - हा मेसेज जपून ठेवा. लसीकरण केंद्रावर हा मेसेज व ओळखपत्र दाखविल्यास लस देणे सोपे जाईल. त्यामुळे गर्दी होणार नाही. 

याच पद्धतीनं आपल्याला आरोग्य सेतू या ॲपवरही रजिस्ट्रेशन करता येईल.


महत्त्वाची सूचना

१८ ते  ४४ वयोगटाचे लसीकरण खासगी लसीकरण केंद्र तसेच संबंधित राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या स्लॉटवर आधारित आहे.  प्रत्येक लसीकरण केंद्रासाठी किमान वय दर्शविले गेले आहे. तसेच लसीकरण केंद्राचे नाव व नियुक्ती स्लॉट आहेत. स्लॉट्स सध्या उपलब्ध नसल्यास, कृपया थोड्या वेळाने पुन्हा तपासा.  


कोरोना लस (covid 19 vaccine) कुणी घ्यावी❓ आणि कुणी नाही❓... कोरोना लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पहा...


कोविड लसीकरणाचा दुसरा डोस कधी घ्यावा❓

1) जर तुम्ही Co-vaccine ही लस घेतली असल्यास दुसरा डोस 28 ते 42 या दिवसा दरम्यान घेण्यात यावा. 

2) जर तुम्ही Covishield ही लस घेतली असल्यास दुसरा डोस 28 ते 56 या दिवसा दरम्यान घेण्यात यावा. 


लसीकरण झाल्यावर प्रमाणपत्र कसे डाउनलोड कराल? 

Step 1 -  www.cowin.gov.in या वेबसाईटवर टच करा. आणि मोबाईल नंंबर टाकून OTP द्वारे लॉगीन व्हा.

Direct link for download Cowin 19 certificate - Click Here

Step 2 - लॉगीन झाल्यानंतर अशी window दिसेल. 

Step 3 - यातील Certificate यावर टच करा.

Step 4 - यानंतर डाउनलोड वर टच करा. तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड झालेले दिसेल. 

प्रमाणपत्र असे असेल... 👇


Direct link for download Cowin 19 certificate - Click Here

लसीकरण केंद्रात जाताना काय काळजी घ्यावी ❓


लसीकरण केंद्रात जाताना काय काळजी घ्यावी ❓

1) लसीकरण केंद्रात जाताना मास्क घातलेला असावा. 

2) दोन व्यक्तीमध्ये कमीतकमी 6 फुट अंतर राखावे. 

3) लस घेण्यासाठी फुल बाही असलेले कपडे टाळावे. शक्यतो पुरुषांनी टी शर्ट घालून जावे. महिलांचा/ मुलींचा पोशाख दंडावर लस देणे सोपे जाईल असा पोशाख असावा. 

4) लस घेतल्यानंतर अर्धा तास शांत बसावे. 

5) मोठ्याने गप्पा मारून गोंधळ करु नये. तिथे काम करणाऱ्या कमर्चाऱ्यांना डिस्टर्ब होईल असे वर्तन करु नये.


Post a Comment

0 Comments

close