Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वयानुरुप प्रवेश - इ. 1ली ते इ. 10वी च्या वर्गात शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही मिळणार प्रवेश. शासन निर्णय - 06 डिसेंबर 2022

इ. 1ली ते इ. 8वी च्या वर्गात RTE act नुसार शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही वयानुरूप शाळेत दाखल करता येते. आता 9वी व 10वी तील विद्यार्थ्यांना सुद्धा शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही कोणत्याही शाळेत वयानुरूप प्रवेश घेता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 16 जून 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. याबाबत सरल पोर्टलवर विद्यार्थी घेणे बाबत अधिक स्पष्टीकरण करणारा शासन निर्णय 6 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आला आहे. 

सर्व महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

महाराष्ट्र राज्यात इयत्ता ५ वी ते १० वी इयत्ता ८ वी ते १० वी व इयत्ता १ ली ते १० वी वर्गाच्या काही शासकीय व अनुदानित शाळा सुरू आहेत. ह्या शाळेत प्राथमिक वर्ग सुद्धा समाविष्ट असल्याने त्यांना RTE-२००९ कायदा लागू आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक आरटीई-२०१३/प्र.क्र.२०/प्राशि-१, दिनांक ३१ डिसेंबर, २०१३ मधील प्रस्तावनेत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. (इ. १ली ते इ. 8वी TC शिवाय प्रवेश) आरटीई अधिनियमातील कलम ४ अन्वये शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल असे नमूद आहे आणि कलम १४ (१) नुसार प्रवेशासाठी वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य समजण्यात यावा अशी तरतुद आहे. जर वयाचा पुरावा नसेल तरी त्या कारणामुळे प्रवेश रोखता येणार नाही. 

Download RTE Act - Click Here


महत्त्वाचे 

1) वार्षिक नियोजन, मासिक नियोजन व वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

2) मुख्याध्यापक पदाचा चार्ज कोणाकडे असावा याबाबत चे परिपत्रक

 (इ. 9वी ते इ. 10वी TC शिवाय प्रवेश)

शासनाच्या असे लक्षात आले आहे की काही कारणांमुळे (उदा. आर्थिक अडचणीमुळे किंवा फीस न भरल्यामुळे इयत्ता ९ वी किंवा १० वी च्या एखा विद्यार्थ्यास खाजगी शाळेतून T.C. (Transfer Certificate) किंवा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) देण्यात येत नाही. अशा विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर इतर शासकीय किंवा अनुदानीत माध्यमिक शाळेत सदर दाखल्या अभावी प्रवेश देण्यात येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते व त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. यामुळे माध्यमिक शाळेतही एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश देणे तसेच वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्याचे बाबतीत प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित करण्याविषयीची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तसा शासन निर्णय १६ जून रोजी घेण्यात आला आहे. 


राज्यातील कोणत्याही शासकीय/महानगरपालिका/नगरपालिका किंवा खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेत इयत्ता ९ वी किंवा इयत्ता १० वी वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्यांना T.C. (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकारण्यात येवू नये. याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देवून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. पूर्वीच्या शाळेकडून T.C. (Transfer Certificate) प्राप्त झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्याला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा यासाठी जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येवून इयत्ता १० वी पर्यंन्त वयानुरूप वर्गात प्रवेश देण्यात यावा. प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही, तसेच शिक्षण खंडीत होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता संबंधित शाळा प्रमुखांनी / मुख्याध्यापकांनी घ्यावी. असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरुद्ध / मुख्याध्यापका विरुद्ध नियमानुसार / कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

TC शिवाय (9वी / 10वी) प्रवेश - शासन निर्णय 16 जून 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


सरल पोर्टलवर विद्यार्थी नोंदविणेबाबत-  उपरोक्त प्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास अशी नवीन शाळा सदर विद्यार्थ्याची सरल पोर्टल वरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे करेल व जुनी शाळा ७ दिवसाच्या आत विनंती मान्य करेल. शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्र प्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावरून मान्य करतील.

वयानुरूप प्रवेश - इ. १ली व इ. १०वी च्या प्रवेशाबाबत शासन निर्णय 06 डिसेंबर 2022 -Click Here



Post a Comment

0 Comments

close