Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणेबाबत

कोविड - १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan) राबविणेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत व त्याच्या अंमलबजावणीसाठी “ माझे विद्यार्थी माझी जबाबदारी " अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणेबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.


माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणेबाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा. - Click Here

२४ सप्टेंबर च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे शाळांचे वर्ग दि. ०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

शासनाकडून जरी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होत असल्या तरी इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग अद्याप नियमितपणे सुरू होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. तसेच सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत तर अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची सुरक्षितता व गुणवत्ता यासाठी अध्ययन-अध्यापन (शिक्षण) प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणेकरिता राज्यातील शाळा, शिक्षक यांच्यासाठी "माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याची (Continuous Learning Plan) अंमलबजावणी करण्यासाठी ४ ऑक्टोबर च्या शासन निर्णयान्वये विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

My Student My Responsibility 

"माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" या अभियानाचा उद्देश

विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अध्ययनासाठी आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे.

कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा राबविणे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या डिजिटल सुविधांच्या उपलब्धतेनुसार सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याद्वारे शैक्षणिक सहाय्य करणे.

माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानांतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षीय यंत्रणेतील

घटक, अधिकारी आणि पालक यांच्या भूमिका व जबाबदारी निश्चित करणे.

सरल प्रणालीद्वारे डिजिटल सुविधांच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थ्याच्या सातत्यपूर्ण अध्ययनाचा मागोवा घेणे. (Tracking of Learning).

सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा ( Continuous Learning Plan ) साठी विविध उपक्रम

१. शैक्षणिक दिनदर्शिका

इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत शैक्षणिक दिनदर्शिका तयार करण्यात आलेली आहे. सदरची शैक्षणिक दिनदर्शिका विद्यार्थी, शिक्षक व पालकापर्यंत स्मार्ट PDF च्या स्वरूपामध्ये https://scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

२. दैनंदिन अभ्यासमाला:

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विषयांसाठी दीक्षा अॅपच्या माध्यमातून "शाळा बंद पण शिक्षण आहे" ही अभ्यासमाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. सदर सर्व अभ्यासमाला https://scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांसाठीसुद्धा दैनंदिन अभ्यासमालेतून ई-साहित्य देण्यात येत आहे.

३. सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) :

विद्यार्थ्यांचा मागील शैक्षणिक वर्षातील अध्ययन हास (learming loss) भरून काढण्यासाठी राज्यस्तरावरून इयत्तानिहाय व विषयनिहाय सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर कोर्स परिषदेच्या https://scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

४. स्वाध्याय उपक्रम:

स्वाध्याय उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत निवडक विषयांचे प्रश्न व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचविण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये या उपक्रमाच्या स्वरूपामध्ये काही बदल करून इतर विषयांचा समावेश करून सदर उपक्रम राबविण्यात येत आहे

५. "शिकू आनंदे" उपक्रम:

कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद व लॉकडाऊनमुळे खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून इ. पहिली ते आठवीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि. ३ जुलै २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने "शिकू आनंदे" (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. परिषदेच्या यू-ट्यूब चॅनलद्वारे राज्यातील सर्व इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम दर शनिवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत प्रसारित करण्यात येतो.

6. इ. १०वी व इ. 12वी साठी विषयनिहाय प्रश्नपेढी संच (सर्व माध्यम) 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यासाठी सर्व विषयांच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या प्रश्नपेढी https://scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

7. इयता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय शंका समाधान सत्राचे आयोजन :

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा कालावधी लक्षात घेता या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दृष्टीने तज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन सुरू रहावे या दृष्टीने सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

8. ऑनलाईन समुपदेशन व महाकरिअर पोर्टल :

राज्यस्तरावरून महाकरिअर पोर्टलच्या माध्यमातून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ५५५ कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. २१००० महाविद्यालयांची संक्षिप्त आवश्यक माहिती तसेच १६ देशांतील १२०० शिष्यवृत्तीच्या प्रकारांची माहिती http://mahacareerportal.com या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सदर पोर्टलच्या माध्यमातून ११५० विविध प्रवेश परीक्षांबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच राज्यातील जिल्हानिहाय ४२६ प्रशिक्षित समुपदेशक विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक १५ मार्गदर्शन सत्रांचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले असून सर्व ऑनलाईन सत्र परिषदेच्या यू-ट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

9. दूरदर्शनवरील ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम :

इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांच्या तासिकांचे प्रक्षेपण दि. १४ जून २०२१ पासून सुरू करण्यात आले असून सन २०२०-२१ मधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यासाठी प्रक्षेपित करण्यात आलेल्या तासिका डी.डी. सह्याद्री वाहिनीच्या यू-ट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत.

तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली. विशेष इंग्रजी तासिका (Special English Hour) यांचे देखील दैनंदिन प्रक्षेपण सुरू आहे. सदर कार्यक्रमांचे दैनंदिन वेळापत्रक https://scertmaha.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येते. याचसोबत दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी देखील लवकरच शैक्षणिक कार्यक्रम सुरु करण्यात येत आहेत.

10. गुगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षण :

सन २०२०-२१ मध्ये प्रातिनिधिक शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या अंतर्गत सर्व प्रशिक्षित शिक्षकांना G-Suit id उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व शिक्षक ऑनलाईन अध्ययन अध्यापन माध्यमांचा वापर करण्यासाठी अधिक सक्षम होण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे आयोजित करण्यात येत आहे व सोबत विद्यार्थ्यांचे व उर्वरित शिक्षकांचे आय. डी. देखील तयार करून सरल प्रणालीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्यातील सर्व शिक्षकांनी सदर प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील.

11. गोष्टींचा शनिवार

विद्यार्थ्यांमधील वाचन कौशल्याच्या विकासासाठी व सर्व विद्यार्थ्यांसाठी श्रवणीय तसेच बोधात्मक अशा गोष्टीचे वाचन करणे यासाठी गोष्टींचा शनिवार या ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात युनिसेफ व प्रथम संस्थेच्या मदतीने करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये दर शनिवारी श्रवणीय व वाचनीय गोष्टींची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

12. पायाभूत भाषिक व अंकगणित साक्षरता विकसन कार्यक्रम (निपुण भारत मिशन)

राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता तिसरी पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांच्या पायाभूत भाषिक व अंकगणितिय क्षमता विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य इ. ची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासाठी वेळोवेळी उपक्रमविषयक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक मुलाने भाषा आणि गणित या विषयाच्या पायाभूत क्षमता संपादित करण्यावर भर देण्यात आलेला आहे. सदर करिता शिक्षक सक्षमीकरण अंतर्गत निष्ठा ३.० अंतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


१3. शिक्षक व विद्यार्थ्यांची सायबर सुरक्षा आणि सुरक्षितता : 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी व उपाययोजना याबाबत ऑनलाईन सत्रांचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
 

१4. दीक्षा ॲप:

दीक्षा हा राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे संपूर्ण देशासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला मोफत प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्र राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील घटकांशी संबंधित ई-साहित्य विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याशिवाय विद्यार्थी मूल्यमापनासाठी वर्कशीट, सहशालेय उपक्रम, विज्ञान प्रयोग व कृती. शिष्यवृत्ती वर आधारित साहित्य इ. चा समावेश आहे. दीक्षा ॲपवरील ई-साहित्य डाऊनलोड करून ऑफलाईन स्वरूपातही वापरता येते. राज्यातील सर्व शाळा, शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ दीक्षा वरील ई साहित्य वापराबाबत सूचना द्याव्यात. याव्यतिरिक्त इतर कोणतेही खाजगी ई साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या मान्यतेशिवाय वापरण्यात येऊ नये.

१5. पूरक अध्ययन साहित्य

विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी छापील स्वरूपात पूरक अध्ययन साहित्य राज्यस्तरावरून विकसित करण्यात आले आहे. यामध्ये वयानुरूप प्रवेशित मुलांसाठी विद्यार्थी मित्र पुस्तिका, इयत्ता पहिली व दुसरीच्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी "करूया मैत्री गणिताशी" कार्यपुस्तिका इ. चा समावेश आहे. या साहित्याचा विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन होण्यास उपयोग होणार आहे.

१6. स्वयं पोर्टल :

शिक्षकांचा व्यावसायिक विकास व विषय ज्ञान समृद्धीकरिता दीक्षा व स्वयम (SWAYAM) हे मोफत प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपातील मोफत कोर्सेस देण्यात आलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठीही शैक्षणिक आशय घटकांवरील कोर्स आहेत. या सर्वांचा वापर विद्यार्थी व शिक्षक करू शकतात.

Post a Comment

0 Comments

close