राज्यातील शाळांना दिनांक २८.१०.२०२१ ते दिनांक १०.११.२०२१ या कालावधीत दिवाळी सणाच्या सुट्टया घोषित करण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाचा उपक्रम 👇
लोकशाही दिपावली स्पर्धा 2021 निमित्ताने आकाशकंदील व रांगोळी स्पर्धा
कोव्हीड- १९ प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा दिनांक ०४/१०/२०२१ पासून ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांना विविध धार्मिक सण / उत्सवांकरीता सुट्टया घोषित करण्यात येत असतात. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील.
११ नोव्हेंबर पासून शाळेचे ऑनलाईन व ऑफलाईन कामकाज सुरु होणार आहे.
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
NAS Exam 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतभर घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सुट्ट्या देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला असावा अशी शिक्षकांमध्ये चर्चा आहे.
NAS Exam विषयी संपूर्ण माहिती व मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.
0 Comments