Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NAS परीक्षेमुळे कमी झालेल्या दिवाळीतील सुट्टयांचे नाताळ किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये समायोजन करणेबाबत....

NAS परीक्षेमुळे कमी झालेल्या दिवाळीतील सुट्टयांचे नाताळ किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये समायोजन करणेबाबत परिपत्रक जारी. 


राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांना विविध धार्मिक सण / उत्सवांकरीता सुट्टया घोषित करण्यात येत असतात. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात आली होती. 

 NAS परीक्षेमुळे राज्यातील इ. १ ली ते इ. १२ वी च्या शाळांना दि. ११/११/२०२१ पासून नियमित शाळा सुरू करण्याचे निर्देश आहेत. दिनांक १२/११/२०२१ रोजी राज्यात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. 

NAS Exam विषयी संपूर्ण माहिती, निवडलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी  डाउनलोड करा. 

NAS Exam मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका व विविध नमूना प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा - Click Here

उपरोक्त संदर्भिय परिपत्रकामुळे दिवाळीच्या सुट्टया कमी झाल्या असतील तर दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे अनुज्ञेय असणाऱ्या सुट्टया राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेवून समायोजित कराव्यात. सदरील पत्र हे सर्व संबंधित शाळांना लागू राहील.

सुट्टयांबाबतचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

Post a Comment

0 Comments

close