Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये वाढ. शासन निर्णय डाउनलोड करा.

शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून इ. 5वी व इ. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकाचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे इत्यादी कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. सद्यस्थितीत वाढलेल्या महागाई मुळे प्रचलित दरामध्ये सुधारणा करुन नवीन दर निश्चित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार प्रवर्गनिहाय प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. 

प्रवेश शुल्क - बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 20 रु. ऐवजी 50 रु 

प्रवेश शुल्क - मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 20 रु. ऐवजी 50 रु 


परीक्षा शुल्क - बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 60 रु. ऐवजी 150 रु 

परीक्षा शुल्क - मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 00 रु. ऐवजी 75 रु 




शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्याबाबत शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

Post a Comment

0 Comments

close