Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रमांतर्गत निबंध लेखन | वक्तृत्व | पोस्टर निर्मिती, गट तिसरा - इयत्ता नववी ते इयत्ता बारावी

संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणारा उपक्रम "माझे संविधान, माझा अभिमान" या उपक्रमांतर्गत आयोजित करावयाचे कार्यक्रम गट तिसरा - इयत्ता नववी ते इयत्ता बारावी

कार्यक्रमाचे नाव

१. निबंध लेखन

२. वक्तृत्व

३. पोस्टर निर्मिती

विषय

१. भारतीय संविधानिक मूल्ये

२. भारत देशापुढील सद्यस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान

३. सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे

४. भारत देशाचा सन्मान, माझे भारतीय संविधान

तपशील

निबंध लेखन आणि वक्तृत्व

दिलेल्या कोणत्याही विषयावर ए- ४ |आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो आणि वक्तृत्वसाठी ०३ मिनिटांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर अपलोड करणे.

पोस्टर निर्मिती

दिलेल्या कोणत्याही विषयावर ए-४ आकाराच्या कागदावर पोस्टर काढून त्याचा फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करणे.

कालावधी

२३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१


फोटो / व्हिडिओ समाजमाध्यमांवर कसा अपलोड करावा? 

भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. 

Post a Comment

0 Comments

close