Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संविधान दिन - घोषवाक्य / घोषणा

माझे संविधान, माझा अभिमान या उपक्रमांतर्गत संविधान दिनानिमित्त घोषवाक्य / घोषणा पाहूया. 

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या संविधान दिवसानिमित्त या वर्षी माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

संविधान दिन - घोषणा, घोषवाक्य


१) संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान
२) श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य हाच संविधानाचा मूलमंत्र
३) सबसे प्यारा संविधान हमारा
४) संविधानाची महानता विविधतेत एकता
५) देशभरमे एकही नाम संविधान! संविधान!
६) लोकशाहीचा जागर संविधानाचा आदर
७) लोकशाही गणराज्य घडवू संविधानाचे भान जागवू


८) जर हवी असेल समता तर मनात जागवू बंधुता
९) समानता संधींची, संविधानाच्या गाभ्याची
१०) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हाच संविधानाचा हेतू हाय
११) संविधान सर्वांसाठी, हक्कासाठी, न्यायासाठी
१२) ऊठ, नागरिका, जागा हो, संविधानाचा धागा हो
१३) जातीयतेच्या बेड्या तोडू, संविधानाने भारत जोडू
१४) संविधान आपले आहे कसे ? सर्वांना न्याय देईल असे


१५) संविधानाने दिला मान, स्त्री-पुरुष एकसमान
१६) संविधानाचा विचार काय ? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
१७) संविधानाने दिला मान, स्त्री-पुरुष एकसमान
१८) संविधानाची अफाट शक्ती, मुक्तविचार अन् अभिव्यक्ती
१९) अत्याचार जुलूम नष्ट करा, संविधानाचा ध्यास धरा
२०) वंचिताना देई उभारी, भारतीय संविधान लय भारी
२१) लोकशाहीचे देते भान, भारतीय संविधान
२२) सर्वांना देई दर्जा समान, संविधानाचे काम महान
२३) संविधानाचे आश्वासन, सर्वांना कायद्याचे संरक्षण
२४) घरात कोणत्याही धर्माचे, समाजात मात्र संविधानाचे
२५) संविधान देते समान पत, एक व्यक्ती - एक मत
२६) बाबासाहेबांचे योगदान, भारताचे संविधान
२७) नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली लोकशाही
२८) संविधान भारताचा आधार, कुणी नसेल निराधार
२९) संविधानाची हीच ग्वाही, उच्च-नीच कोणी नाही
३०) संविधान भारताचा आधार, कुणी नसेल निराधार

Post a Comment

0 Comments

close