Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळा व्यवस्थापन समिती रचना? SMC ची स्थापना कशी करावी?

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील भाग-चार, कलम २१ अनुसार प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये, शाळा व्यवस्थापन समिती (School Management Committee) स्थापन करणे अनिवार्य राहील. 

01 जुलै ची वेतनवाढ व एकूण वाढणारा पगार काढा 5 सेकंदात - Click Here


शालेय व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे असतील. 

१.सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची राहील. ( सदस्य सचिव वगळून).

२. यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील / पालक यामधून असतील.

अ) पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल. 

ब) उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या माता-पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल.

क) साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल असे पहावे.

वाचा - मुख्याध्यापक पदाचा चार्ज कोणाकडे असावा याबाबत चे परिपत्रक

३. उर्वरित २५ टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील. 

अ) स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक.

(स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करील)

ब) शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक एक.

क) पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ / बालविकास तज्ञ 

४. वरील अ.क्र. २ मधील बालकांचे आईवडील / पालक सदस्यांमधून, सदर समिती, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करील. शाळेचे मुख्याध्यापक / प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

५. या समितीतील एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला राहतील.

शाळा व्यवस्थापन समिती मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधित्व देणे बाबतचा शासन निर्णय पहा. 

६. याव्यतिरिक्त २ सदस्य विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून घ्यावेत. यामध्ये एक मुलगा व एक मुलगी असावी. 

SMC स्थापनेबाबतचा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close