Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

30 जानेवारी म. गांधी पुण्यतिथी - हुतात्मा दिन निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम व राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले जाणार.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून व राज्यस्तरावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. 

"शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे." असे म्हणत नयी तालीमच्या रूपाने देशाला शिक्षणाची देणगी देणाऱ्या महात्मा गांधीजींचा स्मृतिदिनानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या 3H (Heart Hand and Head) मन, मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा, शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा यासाठी हुतात्मा दिन, ३० जानेवारी २०२२ ला विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खालील विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा.

30 जानेवारी रोजी हुतात्मा दिन निमित्ताने राबवायचे कार्यक्रम

राबविलेल्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ समाजमाध्यमावर #naitalim2022 या हॅशटॅग सह अपलोड करुन त्यांची लिंक SCERT पुणे च्या लिंक वर अपलोड करा. 
Photo / Video लिंक खालील लिंक वरुन अपलोड करा.  👇






Facebook, Twitter, Instagram वर Video / photo कसे शेअर करावेत❓

Facebook-  #naitalim2022

Go to Facebook - Click Here

Twitter-  #naitalim2022

Go to Twitter - Click Here

Instagram-  #naitalim2022 

Go to Instagram - Click Here

Go to Telegram - Click Here

1) हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रार्थना गायन.

2) आपले घर व परिसर यांची स्वच्छता करणे.

3) पहिली ते पाचवी साठी कार्यक्रम

3.1) महात्मा गांधीच्या आवडीच्या प्रार्थना / भजन यांचे गायन व वेशभूषेसह एकपात्री अभिनय.

महात्मा गांधीच्या आवडीच्या प्रार्थना व भजन mp3/PDF डाउनलोड करा. - Click Here

3.2) स्वावलंबन या उपक्रमांतर्गत 30 तारखेला घरातील स्वतःची कामे स्वतः करणे, दिवसभरातील उत्कृष्ट कृतीचे सादरीकरण.

4) सहावी ते आठवी साठी कार्यक्रम

सत्कृत्य या उपक्रमांतर्गत केलेल्या चांगल्या कामांचा दोन मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करणे.

उदा. स्वच्छता, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, खरे बोलणे, नीटनेटकेपणा, आई-बाबा, भाऊ, बहिण, आजी-आजोबा, शेजारी, नातेवाईक यांना कोणत्याही कामात केलेली मदत.

5) नववी ते बारावी साठी कार्यक्रम

हस्त उद्योग या उपक्रमांतर्गत स्वत:ची आवड / छंद याचा विचार करून एका हस्त उद्योगाची माहिती घ्यावी व दोन मिनिटांचे व्हिडीओ चित्रीकरण करून अपलोड करावे.

6) शाळास्तर, तालुकास्तर, जिल्हास्तरीय उपक्रम

6.1) मातृभाषेतून शिक्षण यातील विविध पैलूंवर परिसंवाद आयोजित करणे.

6.2) अहिंसा या उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे.

१) अहिंसात्मक वृत्ती काळाची गरज भाषण 1 - Click Here  भाषण 2 - Click Here

२) उचललेस तु मीठ मुठभरी साम्राज्याचा खचला पाया. - Click Here

३) चलेजाव चळवळ - Click Here

7) राज्यस्तरीय उपक्रम

SCERT मार्फत मान्यवरांचे महात्मा गांधी यांचे जीवन आणि विचार यावर LIVE व्याख्यान

दि. ३० जानेवारी २०२२

वेळ: सकाळी ११.००

लिंक: https://youtu.be/eKc8s4rZei4


उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या सादरीकरणाचा २ ते ३ मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर (फेसबुक द्वीटर, इंस्टाग्राम) #naitalim2022 या HASHTAG(4) चा वापर करून अपलोड करण्यात यावे व त्या पोस्टची लिंक पुढील लिंक वर अपलोड करा. 

https://scertmaha.ac.in/competitions/ 

Post a Comment

0 Comments

close