Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाहतूक भत्ता शासन निर्णय | राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या  वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत शासन निर्णय. 

केंद्र शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने दि. ०७ जुलै २०१७ दि. ०२ ऑगस्ट २०१७ रोजीच्या आदेशान्वये त्यांच्या कर्मचाऱ्यांना निवासस्थानापासून कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून सुधारीत दराने वाहतूक भत्ता (Transport Allowance) मंजूर केलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २००९ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि. ०१ जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर केलेल्या वाहतूक भरयाच्या दरात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

अनुकंपा धोरण विषयीचे शासन निर्णय - Click Here


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या वाहतूक भत्याचे दर खालील तक्त्यात दर्शविल्या प्रमाणे सुधारण्यात यावेत. हा आदेश दि.०१.०४.२०२२ पासून अंमलात येईल.

एप्रिल 2022 पासून वाहतूक भत्ता नवीन दर खालीलप्रमाणे असतील. 

S1 ते S6 - 675

S7 ते S19 - 1350

S20 व त्यावरील 2700

बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता दर पुढीलप्रमाणे असतील. 

S1 ते S6 - 1000

S7 ते S19 - 2700

S20 व त्यावरील 5400


दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी एप्रिल 2022 पासून वाहतूक भत्ता नवीन दर खालीलप्रमाणे असतील. 

अंघ, अस्थिव्यंगाने अघु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर / श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सध्या अनुज्ञेय असणाऱ्या वाहतूक भत्त्यामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यात येत आहे.

S1 ते S6 - 2250

S7 ते S19 - 2700

S20 व त्यावरील 5400

बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता दर पुढीलप्रमाणे असतील. 

S1 ते S6 - 2250

S7 ते S19 - 5400

S20 व त्यावरील 10800

या आदेशातील वाहतूक भत्याचे प्रदान खाली नमूद केलेल्या अटींच्या अधीन आणि त्यानुसार विनियमित करण्यात येईल.

वाहतूक भत्ता वाढ शासन निर्णय PDF डाउनलोड करा. - Click Here

खालील कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुदेय राहणार नाही. 

एक) कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही. 

दोन) ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतूक सुविधा पुरविण्यात आली आहे, त्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.


वाहतूक भत्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

१) रजा, प्रशिक्षण, दौरा इत्यादी कारणामुळे संपूर्ण कॅलेंडर महिन्यात अनुपस्थित असल्यास त्या महिन्यात हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

२) शासन असेही आदेश देत आहे की, सर्व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांतील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कृषि व कृषितर विद्यापीठांमधील व तत्संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सदरहू आदेश लागू असतील.

३) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१(१९६२ या अधिनियम क्रमांक ५) व्या कलम २४८ च्या परिपत्रकान्वये प्रदान केलेले अधिकार व त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असेही आदेश देत आहे की, जिल्हा परिषदांच्या पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना हे आदेश योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात यावेत.

४) शासन असेही आदेश देत आहे की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनमानानुसार वेतन घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांनाही हे आदेश लागू करण्यात यावेत.

५) शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यावरील खर्च त्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षांखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था, नगरपालिका व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो. त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

वाहतूक भत्ता वाढ शासन निर्णय PDF डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close