दिनांक ८ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात दिनांक १ सप्टेंबर ते दिनांक ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये 'साक्षरता सप्ताह' राबविणेबाबतचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत 'उल्लास- नव भारत साक्षरता' कार्यक्रमाची सन २०२२-२०२७ या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून 'जन जन साक्षर' व राज्य शासनाकडून 'साक्षरतेकडून समृद्धीकडे' हे घोषवाक्ये देण्यात आलेले आहे.
मा. सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक १६/०८/२०२३ यांच्या निर्णयानुसार दिनांक ८ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात दिनांक १ सप्टेंबर ते दिनांक ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये 'साक्षरता सप्ताह' राबविणेबाबतचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. सदर साक्षरता सप्ताह दरम्यान उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवावेत. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी व उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम Mobile App वर स्व- नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सदरच्या 'साक्षरता सप्ताह' कालावधीमध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वार्ड / गाव / शाळा / महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेले आहेत.
नव भारत साक्षरता अभियान अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करणेबाबत शासन निर्णय
उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम Mobile App प्रशिक्षण व App डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
'उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरच्या साक्षरता सप्ताहाची आपल्या व आपल्या अधिनस्त यंत्रणांकडून अंमलबजावणी करण्यात यावी. सदर कार्यक्रमांतर्गत निरक्षरांना प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन दि.८ सप्टेंबर २०२३ या जागतिक साक्षरता दिनी राज्यास सुरू करण्यात यावे. सदरच्या अध्ययन-अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत उपलब्ध साधारणपणे १००० उपलब्ध FLN व्हिडीओ, दिक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या FLN संबंधित व्हिडीओ व उज्जास भाग-१,२,३,४ ची मदत घेण्यात यावी.
शिक्षणाधिकारी (योजना) जि.प सर्व यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक १ सप्टेंबर ते दिनांक ८ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती/ निवडक फोटो रोज शिक्षणाधिकारी (योजना) WhatsApp group व directorscheme.mh@gmail.com या email वर न चुकता पाठवावेत जेणे करून केंद्र शासनाच्या google tracker वर माहिती/ निवडक फोटो सादर करणे सोयीचे होईल.
साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांचा दैनंदिन अहवाल लिंक
साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांचा दैनंदिन अहवाल खाली दिलेल्या लिंक मध्ये अचूक नोंदवावा.
https://forms.gle/CYEpAiY46FJ5shy77
साक्षरता सप्ताह 2024 साजरा करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
0 Comments