Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

SLAS Report 2023 pdf Download | राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण अहवाल 2023 pdf Download

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण अहवाल 2023 | SLAS Report 2023 चे प्रकाशन करण्यात आले आहे. यामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सरस असल्याचे दिसून आले आहे. 



SLAS Exam 2023 बाबत माहिती पहा.


प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी तिसरी, पाचवी आणि आठव्या वर्गातील अध्ययन निष्पत्तींची तपासणी केल्यानंतर हा 'स्लॅस' अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये ३६ पैकी १८ जिल्ह्यांची शैक्षणिक संपादणूक राज्याच्या सरासरीपेक्षाही कमी असल्याचे यात आढळून आले.


नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या धर्तीवर (नॅस) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती पुढे आणण्यासाठी स्टेट लर्निंग अचिव्हमेंट सर्व्हे (स्लॅस) ही चाचणी २४ मार्च रोजी घेण्यात आली होती. यात मराठी आणि गणित या दोन विषयांमध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती जाणून घेण्यासाठी दीड आणि दोन तासांचा पेपर सोडवून घेण्यात आला होता. अहवालात राज्याची मराठी विषयातील अध्ययन संपादणूक ६९.५८ टक्के, तर गणितातील संपादणूक ६०.६९ टक्के आली आहे.


दिनांक २४ मार्च २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणाचा (SLAS) अहवाल आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रकाशित करण्यात आला.

SLAS Exam मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका व विविध नमूना प्रश्नसंच पहा. - Click Here

सदर प्रकाशन प्रसंगी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव, मा. रणजीत सिंह देओल, आयुक्त (शिक्षण) मा. सुरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेचे संचालक मा. अमोल  येडगे, उपस्थित होते. तसेच राज्यस्तरीय इतर संस्थांचे सर्व संचालक उपस्थित होते. परिषदेचे सहसंचालक मा.  रमाकांत काठमोरे साहेब, उपसंचालक, डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक, डॉ. माधुरी सावरकर, उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे , तसेच राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक उपस्थित होते.


राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणाचा अहवाल 2023 खालील लिंकवर पाहता येईल.

Download SLAS Report 2023 PDF

SLAS Report 2023 Maharashtra PDF


SLAS report 2023 Download linkhttps://drive.google.com/file/d/17lsEHP3b10jy-sl2WjdPJ-nO2C5oZY2S/view?usp=drivesdk


State level Achievement Survey Model Question Paper

SLAS Exam मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका व विविध नमूना प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा - Click Here

" राज्यातील अध्ययन निष्पत्तीत सुधारणा व्हावी म्हणून २४ मार्चला स्लॅस चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा शुक्रवारी जाहीर झालेला अहवाल म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा शिक्षण निर्देशांक असेल. "

                            अमोल येडगे

                          संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

 


Post a Comment

0 Comments

close