Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आव्हान पुस्तिका PDF | अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकस्तरीय प्रशिक्षण 05 दिवसांचे तासिकानिहाय वेळापत्रक PDF (इ.6 ते इ.8)| खर्च तपशील प्रति प्रशिणार्थी 500/-

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकस्तरीय प्रशिक्षण वेळापत्रक 2023-24. सदर प्रशिक्षण हे इयत्ता १ ते ८ ला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना देण्यात येणार आहे. 



तालुकास्तरीय प्रशिक्षण तासिकानिहाय वेळापत्रक

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षण तासिकानिहाय 05 दिवसांचे वेळापत्रक PDF डाउनलोड करा. Click Here



STARS प्रकल्प सन २०२३-२४ अंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांना द्यायचे आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०५ दिवस असून विभागस्तर प्रशिक्षण दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२३ या कालावधीत सुरु आहे. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा डायट प्राचार्य यांची राहील.


विभागस्तर प्रशिक्षणानंतर तालुकास्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे एकूण ०५ दिवसांचे असेल. सदर प्रशिक्षणामध्ये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (जि.प., म.न.पा./न.पा./न.प.), आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी ला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचा समावेश असेल. 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन CCE कार्यपद्धती शासन निर्णय - Click Here


अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकस्तरीय प्रशिक्षण वेळापत्रक

इयत्ता १ ली ते ५ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.

१. पहिला टप्पा दि. ०५ ते ०९ डिसेंबर २०२३

२. दुसरा टप्पा दि. १२ ते १६ डिसेंबर २०२३ 

३. तिसरा टप्पा दि. १९ ते २३ डिसेंबर २०२३


इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.

१. पहिला टप्पा दि. 16 ते 20 जानेवारी २०२४

२. दुसरा टप्पा दि. 30 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2024

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता ६ ते ८ च्या तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत शासन परिपत्रक - Click Here


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आकारिक मूल्यमापन नोंदी व संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका  PDF डाउनलोड करा. Click Here


अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आव्हान पुस्तिका - Click Here

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आव्हान पुस्तिका PDF - Click Here

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आव्हान पुस्तिका शिक्षकांसाठी - Click Here

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण PDF - Click Here


अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आव्हान पुस्तिका PDF नमूना क्रमांक 01 (श्री.संदीप निकम) डाउनलोड करा.- Click HereHere


अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आव्हान पुस्तिका PDF नमूना क्रमांक 02 (श्री.विजय खैरे) डाउनलोड करा.- Click Here


अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आव्हान पुस्तिका PDF नमूना क्रमांक 03 (श्रीम. ज्योती जाधव) डाउनलोड करा.- Click Here


सदर तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रती प्रशिक्षणार्थी प्रती दिन रक्कम रु. ५००/- प्रमाणे निधीच्या मर्यादेत खर्च करावा.


खर्चाच्या बाबी व निकष खालील प्रमाणे

१. प्रवास भत्ता (TA) नियमानुसार

2.मानधन - रु. ५०० प्रती दिन (फक्त तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी)

३. प्रशिक्षण वर्ग/Hall

४. इंटरनेट सुविधा

५. भोजन व्यवस्था

६. स्टेशनरी व किरकोळ खर्च रु. ५०/- प्रत्ती प्रशिक्षणार्थी


अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकस्तरीय प्रशिक्षण बाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


(दिपक माळी)

सहसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments

close