राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे करिता मुलांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. 50वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RBVP), २०२३ चे आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाने आपली संमती दिली असून श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे दिनांक २६/१२/२०२३ ते ३०/१२/२०२३ या कालावधीत सदर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे. National Children's Science Exhibition
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. शिक्षणमंत्री, मा. राजकीय प्रतिनिधी तसेच केंद्र शासन व राज्य शासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राज्यातील सर्व अधिकारी, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व शिक्षण क्षेत्रातील इतर लाभार्थी यांना दिनांक २६/१२/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून खालील समाज माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वैज्ञानिक प्रदर्शनात देशातील निवडक शाळा व विद्यार्थ्यांना प्रयोग सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३ स्थळ : श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे.
तारीख : दि. २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३
#NCERT #SCERT
RBVP 2023 opening ceremony live telecast
National Children's Science Exhibition
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३ उद्घाटन Live प्रक्षेपण
Link
https://www.youtube.com/live/SqsFmPYZGks?si=hxshMblg-NRQGfgY
0 Comments