सन २०२6 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
1. सन २०२6 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत.
२. परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत.
३. विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
तसेच सदर शासन परिपत्रक सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयाबरोबरच राज्यातील सर्व महाविद्यालये व सर्व शाळा यांनाही लागू राहील.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५१२२९१६०४५८९१०७ असा आहे.






1 Comments
स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाचे निर्माते एकनाथजी रानडे यांच्या जयतीचां उल्लेख या परिपत्रकामध्ये करण्यात आलेला नाही याबाबत अनेक वर्षापासून सतत पाठपुरावा सुरू असल्याने शासनाच्यावतीने सन २०२५ च्या थोर पुरुष यांच्या जयंतीच्या परिपत्रकात सदर उल्लेख करण्यात येईल असे अर्जदार याना कळविण्यात आले होते पण तसा उल्लेख करण्यात आलेला नाही तरी याबाबत नोद करण्यात यावी ही विनंती.
ReplyDeleteउत्तम ब्राम्हणवाडे ( विभागीय अध्यक्ष पॉवर ऑफ मीडिया, अमरावती.४४४७०८.)
मू. पो.त. नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती.
मो. न.9284070433/9890606193
email ID uttambramhanwade@gmail.com