Maharashtra Government Public Holidays 2024 | महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या 2024
क्रमांक:- सार्वसु-११२३/प्र.क्र.१४८ /जपुक (कार्या- २९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयूडीएल / तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करीत आहे :-
क्रमांक सार्वसु ११२३/प्र.क्र.१४८/जपुक (कार्या-२९ ) . - शासनाने सन २०२४ सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्टया परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) कलम २५ करिता अधिसूचना क्र. सार्वसु ११२३/प्र.क्र.१४८/ पुक (कार्या- २९), दिनांक ९ नोव्हेंबर, २०२३ अन्वये अधिसूचित केल्या आहेत.
0 Comments