Maha TET Exam 2024 | महा टीईटी परीक्षा 2024 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ही 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
1) online test series for TET MARATHI join now for free
2) MAHA TET Exam unit wise Videos for all subjects and guess Question Video.
3) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1 (इ. 1 ली ते 5वी गट) पेपर 2 (इ. 6 वी ते 8वी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या https://mahatet.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर परीक्षेचा अंतरिम निकाल दि. 31 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. सदर निकालाबाबत दि. 01/02/2025 ते 06/02/2025 अखेर पर्यंत ऑनलाईन आक्षेप लॉगिनद्वारे नोंदवुन घेण्यात आले होते. तसेच ईमेलद्वारे दि. 08/02/2025 ते 10/02/2025 अखेरपर्यंत आक्षेप मागविण्यात आलेले होते. सदर आक्षेपावरील कार्यवाही पुर्ण करुन अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे. पेपर 1 व 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दि. 14/02/2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.
पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प./ शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांचेमार्फत यथावकाश पाठविण्यात येईल.
इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे,
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर TET परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक - ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असून दिनांक येतील, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 नियोजन
Maha TET Exam 2024 Schedule
१. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी
०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४
२. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे
२८/१०/२०२४ ते १०/११/२०२४
३. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर। दिनांक व वेळ
दि.१०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३,०० PM
४. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर ।। दिनांक व वेळ
दि.१०/११/२०२४ वेळ १४.३० PM ते ०५.०० PM
Maha TET सुधारित वेळापत्रक
0 Comments