शिवसृष्टी शिष्यवृत्ती ShivSrushti Scholarship - इयत्ता 5वी, 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या व शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सदर शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात येत आहे.
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना नियम व अटी
- शिष्यवृत्तीचा लाभ घेणारा विद्यार्थी इयत्ता 5वी, 8वी या इयत्तेत शिक्षण घेत असावा. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असावा.
- सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
- 01 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक राहील. नाव नोंदणीस 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही अंतिम मुदतवाढ असेल.
- नाव नोंदणीसाठी कोणतेही शुल्क / फी असणार नाही.
- नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी साप्ताहिक टेस्ट सोडविणे बंधनकारक असेल.
- 15 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शिष्यवृत्ती अभ्यासक्रमावर आधारित साप्ताहिक टेस्ट दिल्या जातील. त्या दिलेल्या वेळेत सोडवाव्यात.
- साप्ताहिक टेस्ट मधील गुणानुक्रमे 20 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले जातील.
- 15 डिसेंबर पर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित केली जाईल.
- 25 डिसेंबर रोजी सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजनेची उद्दिष्टे
- शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे.
- आर्थिक गरजू विद्यार्थ्यांना हातभार लाभावा.
- स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी.
- भावी अधिकारी बनण्यातील पाया पक्का व्हावा.
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना स्वरूप व बक्षीस
- शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत शिष्यवृत्ती अभ्यासक्रमावर आधारित साप्ताहिक सराव टेस्ट सोडविणे बंधनकारक असेल.
- शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल.
- शिवसृष्टी शिष्यवृत्ती रक्कम - गुणानुक्रमे प्रथम 20+20 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 500रु, शिष्यवृत्ती दिली जाईल.
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना संपर्क -
इमेल - scholarshipexamstudy@gmail.com
WhatsApp Group - Click Here
If you have any Query or Suggestions, email us / write on WhatsApp
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना नाव नोंदणी लिंक
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म मधील माहिती भरावी. यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, ईमेल इ. माहिती भरावी.
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना नाव नोंदणी लिंक - Click Here
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना साप्ताहिक टेस्ट नियोजन / वेळापत्रक - Click Here
इयत्ता 5वी व 8वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना लागू राहील.
आपल्याकडील गरजू विद्यार्थ्यांना अवश्य शेअर करा.
0 Comments