विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८ व १९ नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत 15 नोव्हेंबर च्या परिपत्रकान्वये कळविण्यात आले होते. आता 16 नोव्हेंबर 2024 च्या परिपत्रकान्वये यामध्ये बदल करण्यात आला आहे.
Chakrika App Download link - Click Here
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ दिनांक : १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ या दिवशी शाळा सुरु ठेवणेबाबत.
शालेय शिक्षण WhatsApp Group
शिक्षण आयुक्तालयाचे 15 नोव्हेंबर 2024च्या संदर्भीय पत्रानुसार ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे त्या शाळा दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ व दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी बंद ठेवणे संदर्भात संबंधित मुख्याध्यापक यांनी त्यांचे स्तरावरून निर्णय घेण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अंशतः सुधारणा करण्यात येत असून ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे त्या शाळेच्या नजीकच्या शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झालेली नाही त्यांचे मदतीने दिनांक : १८ नोव्हेंबर २०२४ व दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी शाळा सुरू ठेवण्यात याव्यात अशा सुधारित सूचना देण्यात येत आहेत.
२/- आपणांस सूचित करण्यात येते की, राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या दिनांक : १८ नोव्हेंबर २०२४ व दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू राहतील. याचे संपूर्ण नियोजन संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित मुख्याध्यापकांच्या मदतीने करावे.
३/- दिनांक : १८ नोव्हेंबर २०२४ व दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा सुरु राहतील याची संपूर्ण जबाबदारी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांची राहील.
दिनांक - १८/११/२०२४ व १९/११/२०२४ या दिवशी शाळा सुरु ठेवणेबाबत 16 नोव्हेंबर 2024 चे परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
Government order for election holiday 2024
Election Holiday for school
शाळांना सुट्टी देणेबाबत नवीन परिपत्रक 15 नोव्हेंबर 2024
केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील.
20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबत परिपत्रक - Click Here
४/- केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
(सूरज मांढरे भा.प्र.से.)
शाळांना सुट्टी देणेबाबत सुधारित परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांनी शासन मान्यतेसाठी सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करणेबाबत मा शिक्षण आयुक्त पुणे यांना आदेशित केले आहे.
त्यानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय मा शिक्षण आयुक्त घेण्यात येणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८, १९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबत शासन परिपत्रक - Click Here
0 Comments