MSBSHSE APP - राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व सुविधा यासाठी मंडळाने 'एमएसबीएसएचएसई' हे मोबाइल ॲप विकसित केले असून, बोर्ड परीक्षेची संपूर्ण माहिती मिळवणे यामुळे सुलभ होणार आहे.
दहावी बारावी परीक्षेसंबंधी अनेकदा विद्यार्थ्यांसह पालकांना चुकीची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मनस्ताप होतो. ते टाळण्यासाठी महामंडळाने हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या सर्व शंका दूर करून विद्यार्थी, पालक, शिक्षकांना रीतसर माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने मोबाइल एमएसबीएसएचएसई ॲप विकसित केले आहे.
एमएसबीएसएचएसई या ॲपमध्ये परीक्षांच्या वेळापत्रकांसह दहावी-बारावी परीक्षेबाबत आवश्यक माहिती, परिपत्रके व आनुषंगिक सुविधांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक, शाळा, कर्मचारी यांच्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसत असतात. त्यांना शाळांमधून माहिती दिली जाते. मात्र, समाजमाध्यमातून अनेकदा काहीही माहितीची शहानिशा न करता ती फॉरवर्ड केली जाते. त्यामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे परीक्षा मंडळाने एमएसबीएसएचएसई ॲप सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
एमएसबीएसएचएसई हे ॲप दहावी आणि बारावी अशा दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना वापरता येईल, तसेच नोटिफिकेशनही मिळणार आहेत.
एमएसबीएसएचएसई ॲपची वैशिष्ट्ये
गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध
विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांसाठी लॉगीन उपलब्ध
नमुना प्रश्नपत्रिका, वेळापत्रक, निकाल यासह सर्व बाबींचा समावेश
फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुणांसह अन्य सुविधा शाळांसाठी उपलब्ध
अन्य नवीन सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगीनशिवाय उपलब्ध
MSBSHSE App Institute Login
MSBSHSE App Student Login
MSBSHSE App Employee Login
MSBSHSE App All Notifications
एमएसबीएसएचएसई ॲप कसे डाउनलोड करावे?
परीक्षा बोर्ड 'एमएसबीएसएचएसई' हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध दिले आहे. विद्यार्थी किंवा पालक हे ॲप डाउनलोड करून वापरू शकतात. यात लॉगीन करण्यासाठी मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करावी लागणार आहे.
0 Comments