Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन | वयोगट व स्तरनिहाय विषय

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणेबाबत शासन परिपत्रक जाहीर. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणेसाठी वयोगट व स्तरनिहाय विषय याविषयी माहिती वाचा. 



भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर, २०२५ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता निबंध / वक्तृत्व नाट्य भूमिका अभिनय / प्रश्नमंजुषा / संगीत /काव्यवाचन / कथाकथन घोषवाक्य / चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 


भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन उद्देश

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, आत्मनिर्भरता, पर्यावरण जागरूकता व स्वदेशी विचारसरणी यांची जपणूक करणे हा आहे. 



भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणेसाठी वयोगट व स्तरनिहाय विषय पुढीलप्रमाणे


1) पूर्व तयारी स्तर विषय -इयत्ता ३ री ते ५ वी

१. माझा भारत देश महान

२. स्वच्छ भारत सुंदर भारत

३. पर्यावरण वाचवा जीवन वाचवा

४. स्वदेशी वस्तूंचे महत्त्व

५. माझे स्वच्छ व सुंदर गाव / शाळा

६. भारतीय संस्कृती आणि सण

७. क्रीडा व खेळ यांचे महत्त्व


2) पूर्व माध्यमिक स्तर विषय - इयत्ता ६ वी ते ८ वी

१. आत्मनिर्भर भारत माझी भूमिका

२. पर्यावरण रक्षण माझी जबाबदारी

३. स्वदेशी वस्तूंचा वापर काळाची गरज

४. ऑपरेशन सिंदूर-राष्ट्रीय सुरक्षा

५. राष्ट्रप्रथम - विद्यार्थी म्हणून माझे कर्तव्य

६. आत्मनिर्भर भारत

७. स्वातंत्रोत्तर भारताची प्रगती

८. स्वातंत्र्यलढा आणि आधुनिक भारताची निर्मिती

९. भारतीय लोकशाही व संविधानाची भूमिका

१०. जागतिक स्तरावर भारताची भूमिका

११. भारतीय ज्ञानप्रणाली


3) माध्यमिक स्तर विषय - इयत्ता ९ वी ते १२ वी

१. आत्मनिर्भर भारत स्वप्न ते वास्तव

२. पर्यावरण संवर्धन आजची आवश्यकता

३. जागतिकीकरण

४. ऑपरेशन सिंदूर राष्ट्रीय सुरक्षा

५. राष्ट्र प्रथम भारतीय युवकांची भूमिका

६. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान

७. दहशतवाद: भारताची भूमिका

९. भारताचा आधुनिक विकास आणि तंत्रज्ञान

८. डिजिटल इंडिया

१०. शिक्षणात AI व रोबोटिक्सचा वापर

११. भारतीय ज्ञानप्रणाली




भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धेसाठी सर्वसाधारण निकषः



१. निबंध स्पर्धा

शब्दमर्यादा: प्राथमिक (२००-२५० शब्द), माध्यमिक (३००-४०० शब्द), उच्च माध्यमिक (५०० शब्दांपर्यंत).

स्वच्छ हस्ताक्षर व नीटनेटके लेखन आवश्यक.

गुणांकन: विषयाची मांडणी (३०), भाषा व व्याकरण (२५), विचारांची सुसंगती (२५). सर्जनशीलता (२०).


२. वक्तृत्व स्पर्धा

वेळ मर्यादा: ३-५ मिनिटे.

भाषण पाठांतर नसून स्वतःच्या शब्दांत मांडावे.

स्पष्ट उच्चार, योग्य हातवारे, आत्मविश्वास महत्त्वाचे.

गुणांकन : विषयज्ञान (३०), सादरीकरण (३०), भाषा व उच्चार (२०), एकूण प्रभाव (२०)


३. नाट्यस्पर्धा

कालावधी : ८-१२ मिनिटे.

नाटकातील सर्व पात्रे विद्यार्थीच असावीत.

गुणांकन: अभिनय (३०), दिग्दर्शन (२५), संवाद व उच्चार (२०), संदेश व सर्जनशीलता (२५).


४. भूमिका अभिनय स्पर्धा

कालावधी: ३-५ मिनिटे.

शालेय गणवेषात सादरीकरण घ्यावे.

गुणांकन : पात्रानुरूपता (३०), आवाज व हावभाव (३०), सर्जनशीलता (२०), एकूण प्रभाव (२०).


५. प्रश्नमंजुषा स्पर्धा

गट स्पर्धा: प्रत्येकी ३ विद्यार्थी.

प्रश्नांचा विषय - सामान्य ज्ञान, शालेय विषय, चालू घडामोडी, साहित्य, क्रीडा, विज्ञान इ.

गुणांकन : बरोबर उत्तरे, वेळेचे पालन, गटसहकार्य.


६. संगीत स्पर्धा

प्रकार: गायन (एकल/गट), वाद्यसंगीत.

वेळ मर्यादा: एकल-३ मिनिटे, गट ५ मिनिटे,


७. काव्यवाचन स्पर्धा

गुणांकन: सूर (३०), ताल (३०), आवाजाची गोडी (२०), एकूण सादरीकरण (२०).


८. कथाकथन स्पर्धा

वेळ मर्यादा : ५ मिनिटे,

कथेतून बोधपर संदेश द्यावा.

गुणांकन: कथानिवड (२५), सादरीकरण व हावभाव (३०), भाषा/उच्चार (२५), एकूण प्रभाव (२०).


९. घोषवाक्य स्पर्धा

दिलेल्या विषयावर आकर्षक, थोडक्यात व नेमके घोषवाक्य तयार करणे.

शब्दमर्यादा: जास्तीत जास्त १२-१५ शब्द.

गुणांकन: आशय (३०), मौलिकता (३०), शब्दरचना (२०), प्रभाव (२०).


१०. चित्रकला स्पर्धा

वेळ : १ तास.

रंगसाहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे.

स्केचपेन/पेन्सिल रंग/वॉटर कलर यांचा वापर करता येईल.

गुणांकन : विषयानुरूपता (२५), रंगसंगती (२५), रेखाटनाची नीटनेटकेपणा (२५), सर्जनशीलता (२५).


उपरोक्त नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल स्थानिक स्तरावर करता येतील परंतु स्पर्धेच्या विषयात बदल करू नये,


वरीलप्रमाणे शाळास्तरावर सदर स्पर्धा आयोजित करून स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेते व प्रोत्साहनपर बक्षिसे शाळा व्यवस्थापन समिती / शाळा विकास व्यवस्थापन समिती यांचे उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करून मान्यवर व्यक्तींच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात यावा. सदर स्पर्धेचे आयोजन करताना कोणत्याही धर्म, जात, पंथ, राष्ट्रपुरुष, थोर संत यांचा अनादर होणार नाही याची दक्षता घेणे, तसेच शासनाचे धोरण व संवैधानिक मूल्यांचे जतन व संवर्धन होईल याची काळजी घ्यावी. सदर कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचेकडून शिक्षण संचालक, प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे यांना दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावा. 


भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणेबाबत परिपत्रक  डाउनलोड करा - Click Here



Post a Comment

0 Comments

close