वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2025-26 करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणे व प्रशिक्षण फी बाबत शासन परिपत्रक जाहीर. Senior Grade and Selected Grade Training Registration Link, Eligible Criteria, Objects
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2025-26 या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे.
नवीन अपडेट
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2025-26 रजिस्ट्रेशन / नावनोंदणी करणेबाबत सूचना
१) दि. 30 एप्रिल 2025 रोजी 12 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 12 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
२) दि. 30 एप्रिल 2025 रोजी 24 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
३) प्रशिक्षण नोंदणी दिनांक 15 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी
रजिस्ट्रेशन मुदत - 21 ते 25 एप्रिल 2025
ईमेलID व मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी शालार्थ, सेवार्थ, BMC पोर्टल लिंक - Click Here
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशी करावी? मार्गदर्शक PDF डाउनलोड करा - Click Here
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कोणासाठी?
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील 12 वर्षे / 24 वर्षे झालेल्या शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल.
Join शालेय शिक्षण WhatsApp Group
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण WhatsApp Group
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2025-26 बाबत सविस्तर सूचना
संदर्भ दिनांक २० जुलै २०२१ च्या शासननिर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
१) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.
२) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
३) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक १५.०४.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २५.०४.२०२५ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
५) सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.
६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023-24
वरिष्ठ/ निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन तात्काळ निकाली काढणेबाबत.. .
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र लिंक
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र लिंक 2023-24
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र असे करा डाउनलोड
1) वरील लिंकवर आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.2) आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणासनोंदणी क्रमांकइंग्रजी मधील आपले नावमोबाईल क्रमांकईमेलप्रशिक्षण गटआपले मराठीतील नावशाळेचे नावजिल्हातालुका3) यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.
उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.
ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र लिंक 2022-23
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन बाबत सूचना
१) दि. 30 एप्रिल 2025 रोजी 12 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 12 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
२) दि. 30 एप्रिल 2025 रोजी 24 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
३) प्रशिक्षण नोंदणी दिनांक 15 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कोणासाठी?
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील 12 वर्षे / 24 वर्षे झालेल्या शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल.
Join शालेय शिक्षण WhatsApp Group
New Update - वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण साठी रजिस्ट्रेशन केलेल्या सर्वांना user ID व Password प्राप्त होणार 👇
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शन
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
New Update 07 जुलै 2022
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 10 जुलै पासून सरु होणार आहे. सदर प्रशिक्षणस 45 दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे. पाससवर्ड नोंदणीकृत ईमेल वर प्राप्त होईल. तेव्हा आपला ईमेल चेक करत राहावे.
दररोजचा दिवसनिहाय सेतू अभ्यास PDF इ. 2री ते इ. 10वी (1 ते 20 दिवस)
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी
रजिस्ट्रेशन मुदत - 12 जून 2023
1) शालार्थ क्रमांक असलेल्यांसाठी नोंदणी लिंक
2) शालार्थ क्रमांक नसलेल्यांसाठी नोंदणी लिंक
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
3) वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी ॲप - प्रशिक्षण ॲप Infosys Springboard डाउनलोड लिंक - Click Here.
४) प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID. शाळेचा UDISE क्रमांक, मोबाईल, ईमेल इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
5) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र ) शुल्क असेल.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२2-23 बाबत सविस्तर सूचना
१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेत स्थळास भेट द्यावी.
२. दि. ३१ मार्च २०२4 रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
३. दि. ३१ मार्च २०२4 रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २9 मे, २०२3 ते 20 जून, २०२3 पर्यंत सुरु राहील.
५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबत नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई-मेलद्वारे देण्यात येतील.
६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत-
गट क्र.१ प्राथमिक गट, गट
क्र. २- माध्यमिक गट,
गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट,
गट क्र. ४ अध्यापक विद्यालय गट.
७. प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID. शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
८. नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
९. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्य आय. डी. वर पाठविण्यात येतील.
१०. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात याची. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास "माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.
११. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
१२.या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.
१३ प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बैंकिंग/ क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.
१४. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र ) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन अदा करावे, एकदा जमा केलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही कारणात्सव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी. यासंदर्भात परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये.
१५. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई मेल आयडीवर संपर्क करावा.
१६. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ/निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
१७. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.
१८. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.
१९. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२3-२4 बाबतचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
0 Comments