Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे 38 व्या वर्षी निधन | Priya Marathe Passes Away

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे ३८ व्या वर्षी निधन झाले आहे. कर्करोगाशी तिची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. तिच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मिरा रोडवरील राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. Priya Marathe Passes Away



अभिनेत्रीने आजवर अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम करीत एक वेगळी निर्माण केली होती. 'या सुखांनो या' या मालिकेतून तिने टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्यानंतर 'तू तिथं मी', 'चार दिवस सासूचे', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण', 'येऊ कशी कशी मी नांदायला', 'तुझेच मी गीत गात आहे' अशा मालिकांमध्ये तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 'पवित्र रिश्ता' मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली. या मालिकेत तिने वर्षा ही भूमिका साकारली होती.


त्याबरोबरच तिच्या 'चार दिवस सासूचे' या मालिकेतील भूमिकेचेदेखील मोठे कौतुक झाले होते. तसेच, तिने 'बड़े अच्छे लगते है', 'उतरन', 'कसम से', 'साथ निभाना साथिया' या मालिकांमध्येदेखील काम केले होते. मराठी हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती.


प्रिया मराठे यांची सोशल मीडियावरची शेवटची पोस्ट


प्रिया वर्षभरापासून सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. ११ ऑगस्ट २०२४ ला तिने पती शंतनू मोघेबरोबरचे काही फोटो शेअर केले होते. जयपूरमधील अमेर फोर्टमधील हे फोटो आहेत. प्रियाच्या या जुन्या पोस्टवर चाहते कमेंट्स करीत दुःख व्यक्त करीत आहेत.

https://www.instagram.com/p/C-iDQvJS2kr/?igsh=MWR4aDMyaDZkYnM2cQ==









वैवाहिक जीवन

प्रिया मराठे यांनी श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघे सोबत २४ एप्रिल २०१२ रोजी लग्न झाले होते. 

Post a Comment

0 Comments

close