Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द, शासन निर्णय - 25 मार्च 2026 | शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फतच होणार

शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करणेबाबत शासन निर्णय 25 मार्च 2026 | शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फतच होणार




महाराष्ट्र राज्य शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिक्षक पदावर (शिक्षणसेवक) होणारी थेट नियुक्ती/पदोन्नती २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयाद्वारे कायमची बंद केली आहे. यापुढे ही नियुक्ती केवळ शैक्षणिक पात्रतेवर न होता, पवित्र पोर्टल (Pavitra Portal) द्वारे स्पर्धा परीक्षेतूनच करण्यात येणार आहे. 


निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे:

जुनी तरतूद रद्द: शिक्षकेतर कर्मचारी (उदा. लिपिक, शिपाई) शैक्षणिक पात्रता पूर्ण करून शिक्षक पदावर रुजू होत होते, ती तरतूद आता रद्द करण्यात आली आहे. 

कारणे: ही नियुक्ती पद्धत विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेवर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम करणारी असल्याने ती बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. 

अंमलबजावणी: ही तरतूद २० वर्षांनंतर अधिक्रमित (Cancel) करण्यात आली आहे. 

नवीन नियम: आता कोणत्याही शिक्षकेतर कर्मचाऱ्याला थेट शिक्षक म्हणून नियुक्त करता येणार नाही. त्यांना शिक्षक होण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेत भाग घ्यावा लागेल. 

परिणाम: या निर्णयामुळे, पूर्वलक्षी प्रभावाने ही तरतूद रद्द झाल्याने अनेक इच्छुक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून, शिक्षक संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे. 


शासन निर्णय 25 मार्च 2026

प्रस्तावना:- राज्यात शिक्षक अभियोगयता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय सन २०१७ पासून शासनाने घेतलेला आहे. यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे. असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरकपत्रकान्वये शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे, ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. यास्तव सदरची तरतूद अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णयः

शासन पूरकपत्र दिनांक १०.०६.२००५ मधील परिच्छेद क्र. ८ येथे खालीलप्रमाणे तरतूद आहे -

"शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर, अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यास शिक्षणसेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षणसेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल."


सदर तरतूद 25 मार्च 2026च्या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.


शिक्षकेत्तर पदावरुन शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशात/परिपत्रकात/संलेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील त्या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहेत. 


शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करणेबाबत शासन निर्णय 25 मार्च 2026 डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close