शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 3 - महाराष्ट्राचा भूगोल | TET Online Test 3 - Geography of Maharashtra
शिक्षक पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी सराव टेस्ट मालिका घेऊन आलो आहोत. सदर सराव टेस्टमध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न अंतर्भूत केलेले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपणास फायदा होईल हे नक्की.
या टेस्ट सिरीज मध्ये tet परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे प्रश्न घेण्यात आलेले आहेत.
समाविष्ट घटक
महाराष्ट्रातील मृदा व वनस्पती, प्राणी
महाराष्ट्राचे खनिजे व उर्जा साधने
प्रश्नांची उत्तरे सर्वात शेवटी दिलेली आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 3 - महाराष्ट्राचा भूगोल
TET Online Test 3 - Geography of Maharashtra
प्रश्न 1 - राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे?
- पुणे
- अमरावती
- नागपूर
- चंद्रपूर
प्रश्न 2 - कोणत्या खडकाचे अपक्षय होऊन काळी मृदा तयार होते?
- बेसॉल्ट
- पाषाण
- जांभा
- टॅकोनाईट
प्रश्न 3 - काळी मृदेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
- सर्व बरोबर
- अ आणि ब बरोबर
- ब आणि क बरोबर
- अ आणि क बरोबर
प्रश्न 4 - जांभी मृदा या मृदेत कोणते पीक प्रामुख्याने घेतले जाते?
- तांदूळ
- गहू
- ज्वारी
- ऊस
प्रश्न 5 - बोर, बाभूळ, खैर, हिरडा निवडुंग या वनस्पती प्रामुख्याने कोणत्या वनात येतात?
- उष्णकटिबंधीय सदाहरित वने
- पानझडी वने
- काटेरी व खुरटी वने
- खारफुटी वने
प्रश्न 6 - वनस्पती व त्यांचे उपयोग चुकीची जोडी कोणती?
- सर्पगंधा - रक्तदाब
- बाभूळ, खैर - टॅनिन
- तेंदूची पाने - बिड्या
- धावल - कर्करोग
प्रश्न 7 - अभयारण्य व जिल्हा योग्य जोड्या किती आहेत?
अ) कर्नाळा - रायगड (पक्षी)
ब) राधानगरी - कोल्हापूर (गवा)
क) भीमाशंकर - आंबेगाव पुणे (शेकरु)
ड) देऊळगाव रेहकुरी - अहमदनगर (काळवीट)
इ) नांदूर मधमेश्वर - नाशिक (पक्षी)
- 5
- 4
- 2
- 3
प्रश्न 8 - महाराष्ट्रातील अभयारण्य व जिल्हा यांची चुकीची जोडी ओळखा.
- नवेगाव - नागपूर
- नागझिरा - गोंदिया
- भामरागड - गडचिरोली
- बोर - वर्धा
प्रश्न 9 - महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहेत?
- 6
- 4
- 8
- 15
प्रश्न 10 - राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
- गडचिरोली
- कोल्हापूर
- रत्नागिरी
- अहमदनगर
प्रश्न 11 - खालीलपैकी उच्च प्रतीचे लोक लोहखनिज कोणते?
- मॅग्नेटाइट
- हेमेटाईट
- लिमोनाईट
- सिडेराईट
प्रश्न 12 - खालीलपैकी कमी प्रतीचा दगडी कोळसा कोणता?
- ॲन्थ्रासाईट
- बिटुमिनस
- लिग्नाईट
- पीट
प्रश्न 13 - खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट हे खनिज सापडत नाहीत?
- रायगड
- कोल्हापूर
- पुणे
- सिंधुदुर्ग
प्रश्न 14 - औष्णिक वीज प्रकल्प व ठिकाण अचूक जोडी असलेले पर्याय किती?
अ) परळी -बीड
ब) एकलहरे - नाशिक
क) खापरखेडा कोराडी - नागपूर
ड) फेकरी - भुसावळ जळगाव
इ) चोला - ठाणे
ई) जामसंडे देवगड - सिंधुदुर्ग
उ) चाळकेवाडी - सातारा
- 5
- 7
- 2
- 4
प्रश्न 15 - मुंबई येथे पहिली खनिज तेल विहीर कोणत्या जहाजाने खोदली?
- सागरसम्राट
- सागरमाथा
- सागरदुर्गा
- भाग्यलक्ष्मी
प्रश्न 16 - पवन ऊर्जेचा जिल्हा कोणता ?
- सातारा
- रायगड
- गडचिरोली
- सिंधुदुर्ग
प्रश्न 17 - स्वदेशी बनावटीची पहिली अनुभट्टी कोणती?
- अप्सरा
- पूर्णिमा
- सायरस
- झर्लिना
प्रश्न 18 - खनिज संपत्तीने समृद्ध असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?
- सिंधुदुर्ग
- कोल्हापूर
- चंद्रपूर
- गडचिरोली
प्रश्न 19 - बॉक्साइट पासून कोणत्या धातूची निर्मिती केली जाते?
- लोहखनिज
- स्टेनलेस स्टील
- ॲल्युमिनियम
- दगडी कोळसा
प्रश्न 20 - लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण?
- बल्लारपूर
- सावंतवाडी
- गोंदिया
- नांदेड
प्रश्न 21 - महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोणते ?
- कोका भंडारा
- सागरेश्वर सांगली
- राधानगरी कोल्हापूर
- ठिपेश्वर यवतमाळ
शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 1 महाराष्ट्राचा भूगोल उत्तरसूची
1-3,
2-1,
3-2,
4-1,
5-3
6-4 धावल - दमा , नरक्या - कर्करोग
7-1
8-1 नवेगाव - गोंदिया
9-1 ताडोबा राष्ट्रीय उद्यान (चंद्रपूर), नवेगाव बांध (गोंदिया) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान/ पेंच उद्यान (नागपूर) गुगामल (अमरावती) चांदोली (सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली - मुंबई उपनगर, ठाणे)
10-1
11-1
12-4
13-3
14-1 देवगड व चाळकेवाडी येथे पवन ऊर्जा केंद्र आहेत.
15-1
16-1 चाळकेवाडी, वनकुसवडे , ठोसेघर , पुसेगाव
17-4
18- 3
19-3
20-2
21- 3



0 Comments