Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 5 - महाराष्ट्राचा भूगोल | TET Online Test 5 - Geography of Maharashtra

शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 5 - महाराष्ट्राचा भूगोल | TET Online Test 5 - Geography of Maharashtra 





शिक्षक पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी सराव टेस्ट मालिका घेऊन आलो आहोत. सदर सराव टेस्टमध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न अंतर्भूत केलेले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपणास फायदा होईल हे नक्की. 

या टेस्ट सिरीज मध्ये tet परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे प्रश्न घेण्यात आलेले आहेत. 

समाविष्ट घटक 

महाराष्ट्रातील लोकसंख्या (जनगणना 2011 नुसार)

महाराष्ट्रातील वाहतूक व दळणवळण


शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 5 - महाराष्ट्राचा भूगोल

TET Online Test 5 - Geography of Maharashtra 

प्रश्नांची उत्तरे सर्वात शेवटी दिलेली आहेत.


प्रश्न 1 - लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?

  1. दुसरा 
  2. तिसरा 
  3. पहिला 
  4. पाचवा 


प्रश्न 2 - सर्वाधिक लोकसंख्या असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? 

  1. ठाणे 
  2. नागपूर
  3. मुंबई उपनगर
  4. पुणे


प्रश्न 3 - सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?

  1. सिंधुदुर्ग 
  2. गडचिरोली 
  3. वाशिम 
  4. मुंबई उपनगर


प्रश्न 4 - सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता?

  1. गोंदिया 
  2. सिंधुदुर्ग 
  3. भंडारा 
  4. रत्नागिरी 


प्रश्न 5 - लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता?

  1. ठाणे 
  2. नाशिक 
  3. मुंबई शहर
  4. मुंबई उपनगर 


प्रश्न 6 -  राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा?

  1. रत्नागिरी 
  2. सिंधुदुर्ग 
  3. पुणे 
  4. कोल्हापूर 


प्रश्न 7 - 100 टक्के नागरी लोकसंख्येचे जिल्हे खालीलपैकी कोणते?

अ) ठाणे

ब) मुंबई उपनगर 

क) मुंबई शहर

ड) नागपूर 

  1. अ आणि ब बरोबर 
  2. अ, ब आणि क बरोबर
  3. ब आणि क बरोबर 
  4. ब क आणि ड बरोबर 


प्रश्न 8 - गोंड जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

  1. गडचिरोली 
  2. नंदुरबार 
  3. नाशिक 
  4. ठाणे


प्रश्न 9 - भिल्ल जमातीचे लोक प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतात?

  1. सातपुडा पर्वतीय प्रदेश 
  2. सह्याद्री पर्वताच्या रांगा 
  3. विदर्भातील टेकड्या
  4. गडचिरोलीतील जंगल

प्रश्न 10 - नागपूर योजना कशासंदर्भात आहे?

  1. कापड उद्योग 
  2. रस्ते विकास 
  3. संदेशवहन 
  4. औद्योगिक वसाहत 


प्रश्न 11 - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो?

  1. नागपूर सोलापूर 
  2. मुंबई नागपूर 
  3. कोल्हापूर चंद्रपूर 
  4. मुंबई दिल्ली 


प्रश्न 12 -  राज्यातील पहिली रेल्वे कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली?

  1. मुंबई ते ठाणे
  2. मुंबई ते पुणे 
  3. मुंबई ते दिल्ली 
  4. मुंबई ते नाशिक

प्रश्न 13 - महाराष्ट्र एक्सप्रेस ही आगगाडी कोणत्या दोन स्थानकादरम्यान चालते?

  1. कोल्हापूर गोंदिया
  2. मुंबई कोल्हापूर 
  3. नांदेड मुंबई 
  4. पुणे मुंबई 


प्रश्न 14 - मुंबई ते पुणे दरम्यान चालणाऱ्या आगगाड्या कोणत्या ?

अ) इंद्रायणी एक्सप्रेस

ब) सिंहगड एक्सप्रेस

क) डेक्कन क्वीन

ड) सिद्धेश्वर एक्सप्रेस 

इ) महालक्ष्मी एक्सप्रेस

  1. अ,ब, क बरोबर
  2. अ, ब, क, ड बरोबर 
  3. ब, क, ड बरोबर
  4. सर्वच बरोबर


प्रश्न 15 - कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाते?  

  1. ७ 
  2. ६ 
  3. ५ 
  4. ४ 

प्रश्न 16 - कोकण रेल्वे वरील सर्वात उंच पूल कोठे आहे ?

  1. करबुडे रत्नागिरी 
  2. पानवळ रत्नागिरी
  3. माणगाव रायगड
  4. कोलाड रायगड


प्रश्न 17 - नाव्हा-शेवा बंदर कोठे आहे ?

  1. मुंबई 
  2. गुजरात 
  3. गोवा 
  4. चेन्नई 


प्रश्न 18 - १२ ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?

  1.  ७
  2.  ९ 
  3. ‌ ४
  4.  ५ 

प्रश्न 19 -  राज्यातील देवीची साडेतीन शक्तीपीठेपैकी अयोग्य पर्याय कोणता?

  1. महालक्ष्मी कोल्हापूर  
  2. तुळजाभवानी तुळजापूर 
  3. रेणुकामाता माहूर 
  4. वैष्णोदेवी अमृतसर 


प्रश्न 20 - राज्यातील अष्टविनायक पैकी किती पुणे जिल्ह्यात आहेत?


प्रश्न 21 -  राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता ?

  1. धुळे कोलकाता NH53
  2. वाराणसी कन्याकुमारी NH44
  3. पुणे नाशिक NH60
  4. मुंबई चन्नई  NH48


शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 1 महाराष्ट्राचा भूगोल उत्तरसूची 

1-2,

2-1, 2011 च्या जनगणनेत ठाणे परंतु ठाणे व पालघर विभाजनानंतर पुणे जिल्हा प्रथम, द्वितीय मुंबई उपनगर , ठाणे तृतीय येतो.

3-2, सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग 

4-4, 

5-4, सध्या सर्वाधिक लोकसंख्या पूणे, घनता मुंबई उपनगर 

6-2 

7-३

8-१

9-१

10-2 

11-२ समृद्धी महामार्ग -७१० किमी, पाच महसूल विभाग, १० जिल्हे, २७ तालुके, ३५० गावामधून जातो.

ठाणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा नागपूर

12-१ मुंबई ते ठाणे -३४ किमी,

13-१ 

14-१ सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबई सोलापूर, महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबई कोल्हापूर, तपोवन एक्सप्रेस मुंबई नांदेड, नंदिग्राम एक्सप्रेस मुंबई नागपूर, कोयना एक्सप्रेस मुंबई कोल्हापूर

15-२ सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई ,मुंबई उपनगर

16-2 सर्वात लांब बोगदा करबुडे उंच पूल पानवळ 

17-१

18- ४ त्रिंबकेश्वर नाशिक, घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर, परळी वैजनाथ बीड, भीमाशंकर पुणे, औंढा नागनाथ हिंगोली

19-४ सप्तशृंगी वनी नाशिक , अर्धपीठ

20-१ चिंतामणी थेऊर, महागणपती रांजणगाव, मयुरेश्वर मोरगाव, श्री विघ्नेश्वर ओझर, गिरीजात्मक लेण्याद्री,

इतर 

बल्लाळेश्वर पाली रायगड, सिद्धिविनायक सिद्धटेक अहिल्यानगर, वरदविनायक महड रायगड.

21- 2 

Post a Comment

0 Comments

close