राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण लागू करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर|गट अ, ब, क, ड मधील नोकरीसाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक पात्रता
शासन निर्णय :- 05 ऑक्टोबर 2025
दि.05 ऑक्टोबर 2025 या शासन निर्णयाव्दारे राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षणाबाबतचे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुध्दीपत्रके, परिपत्रक, पत्र इ. अधिक्रमित करण्यात येत असून नोकरीत ५% आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या खेळाडूंसाठी दि.05 ऑक्टोबर 2026 अन्वये पुढीलप्रमाणे सुधारित धोरण ठरविण्यात येत आहे:-
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण सुधारित धोरणातील तरतुदी :-
१. आरक्षणाची व्याप्ती आणि लागू असलेली कार्यालये :-
सदर ५% समांतर खेळाडू आरक्षण खालील सर्व संस्थांमधील गट-अ, ब, क आणि ड मधील सरळसेवेच्या पदांसाठी बंधनकारक राहील.
i. सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालये.
ii. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती व नागरी स्थानिक संस्था (महानगरपालिका/नगरपालिका/नगर परिषदा).
iii. शासकीय उपक्रम, मंडळे, महामंडळे व विद्यापीठे (कृषी विद्यापीठांसह).
iv. शासकीय अनुदानित शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा व सहकारी संस्था (बँका, साखर कारखाने इ.).
v. याशिवाय सहायक अनुदान मिळणा-या शासन मान्य स्वेच्छा संस्था यांच्यासह अन्य ज्या-ज्या प्रकारच्या संस्था व कार्यालये यांना राज्याच्या तिजोरीतून निधी/अनुदान/सहायक अनुदान मिळते अशा सर्व प्रकारच्या संस्था / मंडळे यांना त्यांच्या आस्थापनेवरील पदावर खेळाडूंसाठी ५% आरक्षण (समातंर आरक्षण) लागू करणे बंधनकारक राहील.
vi. वरील कार्यालयांमधील गट-अ, ब, क व ड संवर्गातील नामनिर्देशनाने भरण्यात येणाऱ्या पदांपैकी ५% पदे विशेष कामगिरी बजावणाऱ्या पुरुष व स्त्री खेळाडूंसाठी आरक्षित असावीत. खेळाडू आरक्षण हे समांतर/विशेष आरक्षण असल्यामुळे ते आडवे आरक्षण आहे, त्यामुळे भरतीची जाहिरात देतांना खेळाडू आरक्षणाच्या राखीव पदांची संख्या प्रत्येक वर्गामध्ये निश्चित करावी.
२. खेळाडू आरक्षणांतर्गत पात्र खेळ व उपप्रकार :-
i. सदर योजनेकरिता ऑलिम्पिक (समर) गेम्स स्पर्धांमधील सन २००५ नंतर सलग तीन ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट असलेले खेळ आणि स्थानिक खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो-खो, बुद्धीबळ, मल्लखांब, व क्रीकेट हे देशी व लोकप्रिय खेळ ५% खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.
ii. तथापि, पात्र खेळांची वरील अट ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स व कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धांना लागू राहणार नाही.
ⅲ. एखाद्या खेळाचा समावेश ऑलिम्पिक (समर) स्पर्धेत झाल्यास अशा खेळ सलग तिस-यांदा ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट झाल्यानंतर व त्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर ५% खेळाडू आरक्षणासाठी पात्र ठरविण्याचे अधिकार आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांना राहतील.
३. खेळाडू आरक्षणांतर्गत पात्र वयोगट :-
i. ५% खेळाडू समांतर आरक्षणासाठी अ.क्र. ५ व ६ मध्ये नमूद अधिकृत संघटनांमार्फत आयोजित होणाऱ्या अ.क्र.२ मधील नमूद स्पर्धांसाठी वरिष्ठ, युवा/युथ व कनिष्ठ वयोगट पात्र राहतील.
ii. कोणत्याही परिस्थितीत १७ वर्षांखालील वयोगटातील कोणत्याही स्पर्धा आरक्षणाकरीता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
४. क्रीडा विषयक अर्हता व पात्रता निकष :-
खेळाडू समांतर आरक्षण लागू असलेले गट, गट निहाय पात्र खेळ/क्रीडा प्रकार व स्पर्धा आणि गट निहाय पात्रता निकष पुढील प्रमाणे राहतील.
परिशिष्ट 1. गट-अ पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक पात्रता:
@ गट-अ साठी प्रात्र क्रीडा स्पर्धा
1. अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
1) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा
॥) एशियन्स गेम्स
III) वरिष्ठ गटाच्या जागतिक चॅम्पियशीप / कप
Iv) कनिष्ठ गटाच्या जागतिक चॅम्पियशीप / कप
V) कार्मेनवेल्थ गेम्स
VI) वरिष्ठ गटाच्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप / कफ
VII) टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा
VIII) ग्रॅंडमास्टर (बुध्दीबळ)
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळ विषयक पात्रता
वैयक्तिक स्पर्धा :- महाराष्ट्राच्या खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व करताना प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान सुवर्ण, रौप्य किंवा कास्य पदक मिळविणे आवश्यक/ग्रॅन्डमास्टर
सांघिक स्पर्धा :- महाराष्ट्राच्या खेळाडूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान / सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळविणे आवश्यक
ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडू.
2- पॅरॉलिम्पिक आंतरराष्ट्रीय स्पर्धाः-
1) पॅरॉलिम्पिक गेम्स
II) पॅरा एशियन गेम्स
ऑलिम्पिक / एशियन / कॉमनवेल्थ गेम्स मध्ये त्या त्या वर्षी आयोजित झालेले सर्व क्रीडा प्रकार आरक्षणासाठी पात्र राहतील.
परिशिष्ट 2- गट-ब राजपत्रित पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक पात्रता
@ गट-ब पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा
अधिकृत आंतरराष्ट्रीय युवा/कनिष्ठ गटातील:-स्पर्धा
१) गट-अ पदाकरीता विहित केलेली खेळ विषयक अर्हता धारण करणारा खेळाडू.
(१) युवा/कनिष्ठ गटातील जागतिक चॅम्पियनशीप/कप
(२) युवा/कनिष्ठ गटातील एशियन चॅम्पियनशीप/कप
(३) युवा/कनिष्ठ गटातील कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप/कप
(४) युथ ऑलिम्पिक / एशियन/कॉमनवेल्थ गेम्स
(५) आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारे आयोजित जागतिक तसेच आशियाई शालेय क्रीडा स्पर्धा (फक्त १९ वर्षाखालील गट मुले/मुली)
(६) जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा
(७) आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा (बुध्दीबळ)
(८) पॅरा जागतिक / एशियन / कॉमनवेल्थ चॅम्पियनशीप
गट-ब (अराज पत्रित) पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक पात्रता
अधिकृत राष्ट्रीय स्पर्धा:-
१) गट-अ व गट-ब (राजपत्रित) मधील पात्रता निकष पूर्ण करणारे खेळाडू.
(१) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (National Games)
२) राष्ट्रीय स्पर्धा/राष्ट्रीय फेडरेशन कप स्पर्धा अजिंक्यपद क्रीडा (अधिकृत एकविध खेळ संघटनेमार्फत आयोजित वरिष्ठ / युथ / कनिष्ठ क्रीडा स्पर्धा)
(३) पॅरा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (पॅरा ऑलिम्पिक कमिटी द्वारा आयोजित)
(४) राष्ट्रीय शालेय खेळ महासंघाव्दारा आयोजित, राष्ट्रीय शालेय (१९ वर्षाखालील वयोगटाची) क्रीडा स्पर्धा
(५) अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा
गट-क - पदांसाठी क्रीडा स्पर्धा व पात्रता
(१) खेलो इंडिया स्पर्धा (SAI द्वारे आयोजित)
(२) राज्य स्तर वरिष्ठ / युथ / कनिष्ठ क्रीडा स्पर्धा (अधिकृत एकविध खेळ संघटनेमार्फत आयोजित)
(३) राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा (फक्त १९ वर्षाखालील गट मुले/मुली)
(४) राज्यस्तर आंतर विद्यापीठ (अश्वमेध)/ (क्रीडा महोत्सव) विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धा पश्चिम
(५) राज्यस्तर पॅरा ऑलिम्पिक व मान्यता प्राप्त संघटनेने आयोजित केलेल्या राज्यस्तर पॅरा क्रीडा स्पर्धा
गट - ड पदांसाठी क्रीडास्पर्धा व पात्रता
१) वरिष्ठ गटातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (National Games) / वरिष्ठ गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा /(National Championship)
(२) वरिष्ठ गटातील पॅरा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (पॅरा ऑलिम्पिक कमिटी द्वारा आयोजित)
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना नोकरीत 5% आरक्षण | गट अ, ब, क, ड नोकरीसाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ विषयक पात्रता | शासन निर्णय ( 05 October 2026 ) डाउनलोड करा. Click Here






0 Comments