Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थिमित्र’ वेबसाइट...

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात सध्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून, इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची सध्या गडबड सुरू आहे. विद्यार्थ्यांना अकरावीचे कट ऑफ गुण, गुणवत्ता यादी क्रमांक, कॉलेज आदी माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी 'विद्यार्थिमित्र' या वेबसाइटद्वारे पाहता येणार आहे. या वेबसाइटवर अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र प्रवेश प्रक्रियेची माहितीही उपलब्ध असल्याचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या विभागांतर्गत असलेल्या कॉलेजांची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. अकरावीप्रमाणेच सर्व माहिती अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही देण्यात आली आहे. याबाबत माहितीसाठी विद्याार्थी, पालकांनी ७७२००२५९०० किंवा ७७२००२८१४००, info@vidyarthimitra.org या ई-मेलवर संपर्क साधावा. 'विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाताना काळजी घेतली पाहिजे. कट ऑफ गुण तपासून अभ्यासक्रमांची माहिती घेतली पाहिजे. 'विद्यार्थिमित्र' या वेबसाइटवर अचूक आणि परिपूर्ण माहिती देण्यात आली असून, पालक आणि विद्यार्थ्यांना ती नक्कीच लाभदायी ठरेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी fyjc.vidyarthimitra.org आणि http://vidyarthimitra.org/rank_predictor वेबसाइटवर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments

close