Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षकांचे प्रकार

जगाच्या पाठीवर ~शिक्षकांचे~ एवढे कुठे प्रकार आहेत का

*शिक्षकांचे प्रकार*
१. १००% अनुदानित शिक्षक
२. अंशतः अनुदानित शिक्षक
३. विना अनुदानित शिक्षक
४. कायम विना अनुदानित   
शिक्षक
५. स्वयं अर्थसाहाय्यित शिक्षक
७. पायाभूत पदवाढ प्रस्तावित शिक्षक
८. पायाभूत पद मंजूर परंतु वैयक्तिक मान्यता प्रलंबित शिक्षक
९. पायाभूत पद मंजूर, वैयक्तिक मान्यता प्राप्त परंतु आर्थिक तरतुदींच्या प्रतीक्षेतील शिक्षक
१०. अनुदानास पात्र घोषित  तुकडीवरील शिक्षक
११. विनाअनुदानित, मूल्यांकनात पात्र परंतु अद्याप अघोषित शिक्षक
१२. अनुदानास पात्र परंतु आर्थिक तरतूदीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक
१३. अनुदान पात्र, २०% टप्पा मंजूर परंतु २ वर्षांपासून पुढील अनुदान टप्प्याच्या प्रतिक्षेतील शिक्षक
१४. शिक्षण सेवक( सहा. शिक्षक, परिविक्षाधीन)
१५. जुनी पेन्शन योजना लागू असणारे शिक्षक
१६. नवीन परिभाषीत अंशदान पेन्शन योजनेतील शिक्षक
१७. २००५ पूर्वीचे परंतु अंशतः अनुदानित असल्याने नवीन पेन्शन योजना लागू झालेले शिक्षक
१८. २००५ पूर्वीचे, अंशदान पेन्शन योजनेला कोर्टात आव्हान दिलेले म्हणून कुठलीच कपात नसणारे शिक्षक
१९. इंग्रजी माध्यमातील शिक्षक
२०. रात्रशाळेतील शिक्षक
२१. अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षक
२२. अर्धवेळ शिक्षक
२३. घड्याळी तासिकेवरील शिक्षक
२४. कंत्राटी शिक्षक
२५. एकापेक्षा अधिक शाळेवर काम करणारा, एकत्रित कार्यभार गणना करून पूर्णवेळ झालेला शिक्षक
२६. नवनियुक्त परंतु वैयक्तिक मान्यतेच्या प्रतीक्षेत असणारा शिक्षक
२७. अतिरिक्त शिक्षक
२८. कला शिक्षक
२९. क्रीडा शिक्षक
३०. नुकतीच निवडपूर्व शिक्षक पात्रता परीक्षा दिलेला व शासनाच्या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणारा नवीन होऊ घातलेला शिक्षक.
३१. २०१२ नंतर नियुक्त, शासन मान्यता प्राप्त, शासनाने अनधिकृत भरती म्हणून घोषित केलेला व न्यायालयाने न्याय दिलेला, तरीही डोक्यावर सतत टांगती तलवार असलेला शिक्षक
एखादा प्रकार राहिला असेल तर माफ करावे.

*सलाम, शिक्षण खात्यातील शिक्षक पदाची इतकी प्रतवारी जी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात नसेल अशी तयार करून शिक्षणाच्या अनेक क्लिष्ट समस्या निर्माण करणाऱ्या प्रशासनाला*

Post a Comment

0 Comments

close