Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये ९२ कंत्राटी शिक्षक नेमणूक आॅक्टोबर

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये ९२ कंत्राटी शिक्षक नेमणूक करण्यात येत असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठड्यात उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. विद्यापीठात तब्बल ६०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
विद्यापीठाने ९२ कंत्राटी शिक्षक नेमणूकीवर व्यवस्थापन परिषदेत वादळी चर्चा झाली होती. राजेश भोयर आणि नितीन कोंगरे यांनी विद्यापीठाच्या निर्णयाचा विरोध करताना नियमावर बोट ठेवले होते. कंत्राटी प्राध्यापकांच्या वेतनावर कोणत्या निधीतून खर्च होणार असा सवाल करण्यात आला. तर विद्यापीठाला अशाप्रकारचे कंत्राटी शिक्षक नेमता येणार नाहीत, असा दावा सदस्यांनी केला होता.
दरम्यान, कुलगुरू डॉ. काणे यांनी कंत्राटी शिक्षक नेमणूक करण्यावर विद्यापीठ ठाम असल्याचे स्पष्ट केले होते. राज्य सरकारने नागपूर विद्यापीठाला मंजूर रिक्त पदांच्या ५० टक्के जागा म्हणजेच ६९ प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजूरी दिली होती. परंतु, त्यानंतर राज्य सरकारने अचानक भरतीला बंदी घातली. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये प्राध्यापकांची रिक्त पदे सातत्याने वाढत आहेत. त्याचा फटका विभागांमधील शैक्षणिक व संशोधन कार्यावर पडतो आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापक नेमणूकीसाठी जाहिरात काढली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कंत्राटी प्राध्यापकांना २४ हजार रूपयांचे दरमहा वेतन देण्यात येणार आहे. तर ही नियुक्ती ३० एप्रिलपर्यंतच राहणार आहे. यावर्षी ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीकरिता निवड करण्यात येणार आहे. तर पुढील शैक्षणिक सत्राच्या आधीच निवड प्रक्रीया करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
कंत्राटी प्राध्यापकांच्या नियुक्तीकरिता विद्यापीठ कायद्यात नमूद केलेली निवड समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक विषयाचे तज्ज्ञही नियुक्त होणार आहेत. निवड समितीमार्फत नियुक्ती होणार असल्याने या कंत्राटी प्राध्यापकांना शैक्षणिक व परीक्षा विषयक जबाबदारीही देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments

close