Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आरोग्य म्हणी

➖➖➖➖☘☘☘➖➖➖➖

🌺 खाल्ल दररोज गाजर-मुळे,
    तर होतील सुंदर तुमचे डोळे.

🌹 सकाळी नाश्ता करावा मस्त,
    मोड आलेले धान्य करावे
    फस्त.

🌸 डाळी भाजीचे करावे सूप,
    अखंड राहील सुंदर रूप.

☘ तरोट्याच्या भाजीला म्हणू
    नका स्वस्त,
    आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.

🌺 जवळ करा लिंबू संत्री,
    दूर होईल पोटातील वाजंत्री.

🌸 पपई लागते गोड गोड,
    पचनशक्तीला नाही तोड.

☘पालेभाज्या घ्या मुखी;
   आरोग्य ठेवा सदा सुखी.

🌹 भेसळयुक्त अन्न खाऊ नका;
    आरोग्य धोक्यात आणू नका.

🌸 दररोज एक फळ खावू या;
    आरोग्याचे संवर्धन करु या.

🌺 भोजनोत्तर फळांचा ग्रास;
       थांबवेल आरोग्याचा ऱ्हास.

☘ प्रथिने, जीवनसत्वे आणि
      क्षार;
     आहारात यांचे महत्व फार.

🌺 हिरवा भाजीपाला खावा
       रोज;
       राहील निरोगी आरोग्याची
       मौज.

🌸 जेवणा नंतर केळी खा;
       पचनशक्तीला वाव द्या.

🌺 साखर व तूप यांचे अती
       सेवन करु नका,
       मधुमेह व लठ्ठपणाला
      आमंत्रण देऊ नका.

☘ खावी रोज रसरशीत फळे;
       सौंदर्यवृद्धीसाठी नको
       प्रसाधन वेगळे.

🌸 गालावर खेळते सदा हास्य,
       फळे व भाज्यांचे आहे ते
       रहस्य.

🌹 पपई, गाजर खाऊ स्वस्त,
       डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

🌸 सुका मेवा ज्यांचे घरी,
       प्रथिने तेथे वास करी.

☘ भाज्या जास्त वेळ शिजवू
       नका,
       जीवनसत्वांचा नाश करु
       नका.

🌺 जो घेईल सकस आहार,
       दूर पळतील सारे आजार.

🌹 भाजीपाल्याचं एकच महत्व,
       स्वस्तात मिळेल भरपूर
       सत्व.

💐 शेंगेत शेंग, शेवग्याची शेंग,
       तिचा पाला, तीच अंग, सत्व
       आहे तिच्या संग.

🌹 कळणा कोंडा खावी नाचणी,
       मजबूत हाडे खांबीवाणी.

🌸 आरोग्य म्हणींचे हे उपयोगी
       सत्र;
       अंमलात आणाल तर रहाल
       कायमचे निरोगी मात्र.

Post a Comment

0 Comments

close