शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो, सतत थकवा जाणवतो. शरीरातील रक्त वाढवण्यासाठी औषोधोपचाराबरोबरच योग्य आहाराची गरज असते.
What to eat for blood growth? Rakt vadhisathi kay khave?
मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. म्हण्जेच हिमोग्लोबिन कमी झाले की, शरारीतील रक्ताचा पुरवठा देखील योग्य रित्या होत नाही. असे होऊ नये म्हणून अशा वेळी डॉक्टरच आपल्याला काय खावे? खाऊ नये? याबाबत सांगतात.
त्यावर एक नजर...
1. *बीट* :
याच्या सेवनाने व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी मिळतात. याने शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील वाढत वाढते.
2. *पालक* :
यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. याने शरीरातील हिमोग्लोबिन चांगलेच वाढू शकते.
शरीरातील रक्त कमी होण्याची कारणे व जाणवणारी लक्षणे जाणून घेण्यासाठी येथे टच करा.
3. *अंडी* :
अंडी खाल्ल्याने शरीराला लोह मिळते तसेच अनेक पोषक घटक यात असतात.
4. *सुकामेवा* :
सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोह मिळते.
5. *मासे* :
कोळंबी, सुरमई, बांगडा असे मासे आहारातून जरूर खा. ज्यामुळे शरीराला मुबलक लोह मिळते.
6. *डाळिंब* :
डाळिंबामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात.
7. *गूळ-शेंगदाणे*
रात्रीच्या जेवणानंतर गूळ शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.
8. मोड आलेली कडधान्ये खा
रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. यामुळे आवश्यक जीवनसत्त्व मिळतात व रक्तवाढ लवकर होते.
9. टोमॅटो
टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते. एक ग्लास टोमॅटोचा रस किंवा टोमॅटो सूप पिऊन देखील रक्त वाढ होण्यास मदत होते.
10. खजूर आणि दूध
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दुध आणि खजूर खाणे उत्तम उपाय आहे. रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दुध प्यावे. दुध प्यायल्या नंतर खजूर खावे.
ज्या लोकांना आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवायचे आहे त्यांनी आहारात वरील पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवायला हवे. त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होईल. अशक्तपणा येणार नाही.
Tags
आरोग्य मंत्र, रक्तवाढ, Health, हिमोग्लोबिन, अशक्तपणा,
0 Comments