शिष्यवृत्ती परीक्षा - बुद्धिमत्ता, घटक - इंग्रजी अक्षरमाला / वर्णमाला या घटकांवरील प्रश्न कसे सोडवावेत? उपयुक्त टिप्स
इंग्रजी अक्षरमाला यामध्ये A पासून Y पर्यंत ची अक्षरे मांडलेली असतात. ही अक्षरे कोणत्याही क्रमाने मांडलेली असू शकतात. परीक्षेत प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानांवर वरच्या बाजूला अक्षरमाला छापलेली असते.
या अक्षरमालेत पुढील प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
१) अक्षरांमधील अंतर,
२) अक्षरांचा गट व त्यातील अंतर,
३) अक्षरमालेतील डाव्या बाजूने विशिष्ट क्रमांकाचे अक्षर
४) अक्षरमालेतील उजव्या बाजूने विशिष्ट क्रमांकाचे अक्षर
५) अक्षरमालेतील डाव्या बाजूने विशिष्ट क्रमांकाच्या अक्षराच्या डावीकडील किंवा उजवीकडील अक्षर
६) अक्षरमालेतील उजव्या बाजूने विशिष्ट क्रमांकाच्या अक्षराच्या डावीकडील किंवा उजवीकडील अक्षर
७) मधल्या अक्षराच्या डावीकडील किंवा उजवीकडील अक्षर
८) अक्षरांचा विशिष्ट क्रम
९) अक्षरे व अंकांचा संबंध
शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भातील ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा.
इंग्रजी अक्षरमाला / वर्णमाला या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त टिप्स
१) विद्यार्थ्यांनी अक्षरमालेच्या पट्टीकडे न पाहता, अक्षरांचे क्रमांक लक्षात ठेवण्याचा सराव करावा. अक्षर पाहिल्याबरोबर चटकन त्याचा क्रमांक डोळ्यासमोर यायला हवा. यामुळे अक्षरपट्टीवर अक्षरे पाहणे व त्याचा क्रमांक शोधणे यांचा वेळ वाचेल.
२) एखाद्या अक्षराचा विरुद्ध टोकाकडून असलेला क्रमांक काढण्यासाठी २६ मधून त्या अक्षराचा क्रमांक वजा करावा.
उदा- C अक्षराचा डावीकडून क्रमांक 3 तर उजवीकडून 26-3 म्हणजेच 23 येतो.
३) दोन अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर हे त्या दोन अक्षरांचे क्रमांक मिळवून त्याच्या निम्मे (सरासरी) केल्यावर येणाऱ्या संख्येइतके अक्षर असते.
उदा - B व J च्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते?
B चा क्रमांक - २
J चा क्रमांक - १०
सरासरी - ६
म्हणून ६ व्या क्रमांकावरील F हे अक्षर B व J च्या मध्यभागी येईल.
४) प्रश्नांमध्ये अक्षरापासून असा उल्लेख असल्यास त्या अक्षरांचा क्रमांक १ धरुन पुढे - मागे मोजावे.
५) अक्षराच्या डावीकडे / उजवीकडे असा उल्लेख असल्यास संबंधित बाजूला त्या अक्षराच्या पुढच्या अक्षराचा क्रमांक १ धरावा.
६) दोन अक्षरांच्या दरम्यान म्हणजे ती दोन अक्षरे वगळून त्यांच्या मध्ये असणारी सर्व अक्षरे
शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरणे ९ मार्च पासून सुरु
७) एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे ती दोन अक्षरे धरुन मधली सर्व अक्षरे विचारात घ्यावीत.
८) डावी / उजवी बाजू कोणती घ्यावी हा प्रश्न बऱ्याचदा गोंधळ करतो. अक्षरमाला सोडविताना डावी व उजवी बाजू ही आपल्या हाताच्या डाव्या व उजव्या प्रमाणे घ्यावी. म्हणजेच आपल्या उजव्या हाताला उजवी बाजू...
वरील टिप्स चा वापर करुन इंग्रजी अक्षरमाला या घटकांवरील प्रश्न सोडविल्यास एकही प्रश्न चुकणार नाही.
अतिशय महत्त्वाचे
0 Comments