Home अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शाळाबाह्य कामे
शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शाळाबाह्य कामे
September 03, 2021
ज्ञानदान करणे म्हणजेच शिकविणे हे शिक्षकांचे महत्त्वाचे काम. परंतु याबरोबरच शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक जास्तीची कामे करावी लागतात. त्याला अशैक्षणिक शाळाबाह्य कामे म्हणतात.
शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शाळाबाह्य कामे
ऑनलाईन माहिती भरणे उपस्थिती भत्त्याचे काम १९ शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहून काढणे. घरोघरी जाऊन किती लोकांकडे फ्रिज, टी.व्ही आदी चैनीच्या वस्तू आहेत याची माहिती घेणे. घरोघरी जाऊन निवडणुकांसाठी मतदारांची माहिती घेणे. घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबवणे. चाळीसहून अधिक नोंदवह्या ठेवणे जंतनाशक गोळी देण्याचे अहवाल डिजिटल शाळा संदर्भात फाईल अपडेट ठेवणे. दशवार्षिक खानेसुमारीचे (जनगणना) काम करणे प्रभात फेऱ्या, जनजागृती, नाट्य, नाट्युकले तयार करणे. राष्ट्रीय नेत्यांचे जन्मदिवस-मृत्युदिवस साजरे करणे बायोमेट्रिक हजेरी मध्यान्ह भोजन शिजवणे मध्यान्ह भोजनासाठी किती तांदूळ-डाळ-सरपण शिल्लक आहे याची नोंद करणे. गरज पडल्यास स्वतःच्या पैशातून या वस्तू आणणे. मध्यान्ह भोजन सर्व रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे. मीना राजू मंच चालवणे मुलांना आधारकार्डे मिळवून देणे याशिवाय नित्य नियमाने विचारले जाणारे नवनवे अहवाल सादर करणे (एकूण सुमारे २५) लोकसहभाग मिळवणे व त्याचा अहवाल तयार करणे लोहयुक्त गोळी देणे वर्गात किती विद्यार्थी हजर आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्यासकट स्वतःचा रोजच्या रोज सेल्फी काढणे आणि तो व्हॉट्सॲपवरून शिक्षणखात्याकडे पाठवणे वर्गातील पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीचे अहवाल विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल विमा योजना विविध अभियाने राबवणे विशेष दिवसांसाठी राबवायची अभियाने वेगळ्यावेगळया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे वेगळ्यावेगळया योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे गावात हिंडून शालाबाह्य मुले शोधणे व त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर मिळवणे शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार घेण्यात येणारे उपक्रमांचे आणि स्पर्धांचे अहवाल शैक्षणिक सहली आयोजित करणे मुलींना शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती शोधणे सरल प्रणालीवर माहितीचे संकलन सहशालेय उपक्रम आणि स्पर्धांचे अहवाल ऑफलाईन मुलांचा शोध घेणे. वेगवेगळे सर्वेक्षण करणे. कोविड -19 दररोजच्या सर्वेक्षणाचे काम करणे. सरकारी खात्यातील सर्व विभागांना मदत करणे. महसूल, आरोग्य, वनखाते. झाडे लावणे. लावलेले झाड जगले की मेले त्यांचे अहवाल पाठविणे. आणखी काही शाळाबाह्य कामे तुम्हांला सुचत असतील तर कमेंट करुन सांगा. यामध्ये ॲड केली जातील.
2 Comments
अशैक्षणिक काम -तालुका आपत्ती व्यवस्थापन दिवस रात्र तहसिल कार्यालयात काम बघणे
ReplyDeleteकोविड काळात सर्वेक्षण करणे, positive patients chya संपर्कातील contact tracing करावे, लसीकरण केंद्रावर duty, isolation centre वर duty करावे.
ReplyDelete