Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

किशोर दिवाळी अंक 2021 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन.

'किशोर' दिवाळी अंक 2021 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले आहे. 




बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या 'किशोर' दिवाळी अंक 2021 चे प्रकाशन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण, गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे , बालभारतीचे संचालक विवेक गोसावी, किशोरचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे आदि उपस्थित होते. लवकरच हा दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध करण्यात येणार आहे. 

किशोर मासिक दिवाळी अंकासह 50 रुपयात वर्षभर मिळणार घरपोच. पहा कसे मागवावे? 

किशोर दिवाळी अंक २०२१ लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. अनेक मान्यवर साहित्यिकांसोबतच नवोदित बालसाहित्यिकांच्या एकापेक्षा एक सरस कथा, कविता आणि लेखांनी हा अंक सजला आहे. दसऱ्यापर्यंत अंक सर्वत्र स्टॉलवर उपलब्ध असेल. या अंकासाठी ऑलिम्पिक स्पर्धेतील सात विजेत्यांना अभिवादन करणारे आणि त्यांना मुलांच्या रूपात दाखवून गंमत आणणारे अप्रतिम मुखपृष्ठ साकारले आहे ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन यांनी. 

किशोर मासिक विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा. Click Here

किशोर दिवाळी अंक 2021 मध्ये एकूण 132 पाने असून ती सर्व रंगीत पाने आहेत. किशोर दिवाळी अंक 2021 ची किंमत 75 रु आहे. किशोर दिवाळी अंक 2021 बालभारतीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. 

किशोर दिवाळी अंक 2021 pdf  स्वरूपात डाउनलोड येथे टच करा.  Click Here

#किशोरमासिक 

#बालभारती 

#बालसाहित्य

Post a Comment

0 Comments

close