Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परीक्षेची यशस्वी तयारी 2022 | इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय ऑनलाईन मार्गदर्शन सत्र 2022

इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी  यासाठी “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दि. २३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात येत आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२  या कालावधीत आयोजित  करण्यात आली आहे. कोविड- १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशिराने सुरु होणे तसेच शाळा बंद असताना शाळांमध्ये सुरू असणारे ऑनलाईन शिक्षण यासारख्या अनेक शैक्षणिक समस्यांमुळे इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी  यासाठी  विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दि. २३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात येत आहे. 



सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी  (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

" परीक्षेची यशस्वी तयारी 2022 " - ऑनलाईन मार्गदर्शन सत्र नियोजन इयत्ता दहावी. 


Successful-Exam-Preparation-Online-Guide Time-Table

दिनांक व वेळ इयत्ता विषय लिंक
23 फेब्रुवारी 22
दु. 3 ते 4
इ.10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 Join Webinar Click
24 फेब्रुवारी 22
दु. 3 ते 4
इ.10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 Join Webinar Click
25 फेब्रुवारी 22
दु. 12 ते 1
इ.10वी सामाजिक शास्त्र - वेळेचे व्यवस्थापन Join Webinar Click
25 फेब्रुवारी 22
दु. 3 ते 4
इ.10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 Join Webinar Click
28 फेब्रुवारी 22
दु. 3 ते 4
इ.10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 Join Webinar Click
1 मार्च 22
दु. 3 ते 4
इ.10वी यशस्वी परीक्षेची तयारी Join Webinar Click

प्रश्नपेढी संच - दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

Post a Comment

0 Comments

close