राज्यातील शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याबाबत मा. प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक ०५ मे २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिक्षकांचे वेतन कॅफो स्तरावरून दरमहा 1 तारखेला होण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.
१. दिनांक ०१ मे २०२२ पासून खाजगी अनुदानित शाळेतील (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे नियमित मासिक वेतन देयक दरमहा १० तारखेपर्यंत वेतन पथकास सादर करणे ही बाब लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत सेवा म्हणून अधिसूचित करण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर सेवा विहित कालावधीत देणे आवश्यक असून सदर सेवा विहित कालावधीत न दिल्यास अधिनियमात दंडात्मक कार्यवाहीची तरतूद आहे याची नोंद घ्यावी.
२. राज्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन देयक शालार्थ प्रणालीतून सादर करताना शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्रमांक आशि/ आस्था-ब/१२१/ शालार्थ/२०१४/११४५, दिनांक २० नोव्हेंबर २०१४ मध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार सादर केले जाईल याची दक्षता घ्यावी. सदर वेळापत्रकानुसार कार्यवाही केल्याचा महिना निहाय अहवाल सोबत जोडलेल्या प्रपत्र अ मध्ये educommktf5@gmail.com या ई-मेल वर न चुकता सादर करण्यात यावा.
YCMOU B.Ed. 2022 साठी Registration (नावनोंदणी) करण्यास सुरुवात - Click here
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय - शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी उपयुक्त सर्व शासन निर्णय डाउनलोड करा.शालार्थ मधून वेतन सादर करणेबाबतचे वेळापत्रक पहा.
३. जिल्हा परिषदेच्या अधिनस्त शिक्षकांचे वेतन देयक कोषागार कार्यालयातून पारित झाल्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या खात्यावर बेतनाची रक्कम जमा होते. तद्नंतर सदर रक्कम गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मुख्याध्यापकाच्या संयुक्त खात्यावर जमा केली जाते व त्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा केले जाते. सदर प्रक्रियेस लागणाच्या कालावधीमुळे वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर प्रत्यक्ष जमा होण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ZPFMS प्रणाली द्वारे होणार शिक्षकांचे वेतन
४. सद्यस्थितीत जालना जिल्हा परिषदेमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडून ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांच्या खात्यावर थेट वेतनाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत मा. प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी देखील शिक्षकांचे वेतन याच धर्तीवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडून ZPFMS ऑनलाईन प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
पगार 1 तारखेला करणेबाबतचे शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
Join WhatsApp Group
0 Comments