Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इयत्ता पहिली विद्याप्रवेश - शाळापूर्व तयारी कार्यक्रम शिक्षक मार्गदर्शिका PDF, विद्यार्थी कृतीपत्रिका PDF व उद्बोधन सत्र

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील बालकाच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (Foundational Literacy & Numeracy (FLN) यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. त्यानुसार निपुण भारत अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी विविध उपक्रम/ कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. इयत्ता पहिली साठी विद्याप्रवेश - शाळापूर्व तयारी कार्यक्रमाची अंमलबजावणी 20 जून ते 10 सप्टेंबर करावयाची आहे. 


इयत्ता पहिली विद्याप्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम अंमलबजावणी 

इयत्ता पहिलीच्या वर्गात विद्यार्थी प्रवेशित होणेपूर्वी पायाभूत क्षमता योग्य प्रमाणात विकसित झालेल्या असल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील इयत्तानिहाय क्षमता अधिक जलद गतीने विकसित होतात. या अनुषंगाने, संदर्भ क्रमांक २ नुसार सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेणे सहजसुलभ व्हावे व त्यांच्या वयानुरूप आणि विकासाच्या दृष्टीने योग्य प्रारंभिक शिक्षण अनुभव देणे, यासाठी विविध खेळ, कृती उपक्रमाचे आयोजन शाळांमध्ये होणे आवश्यक आहे. यासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस तीन महिने ( १२ आठवडे तथा ६० दिवस) कालावधी असणारे खेळ व कृती यांवर आधारीत "विद्याप्रवेशः शाळापूर्व तयारी कार्यक्रम" सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. संदर्भ क्रमांक ३ नुसार राज्यातील शाळा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये दोन टप्यात सुरु होणार आहेत त्यानुसार इयत्ता पहिली विद्याप्रवेश: शाळापूर्व तयारी कार्यक्रम पुढील कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये घेण्यात यावा.

विद्या प्रवेश - शाळापूर्व तयारी कार्यक्रमा कालावधी 

२० जून २०२२ ते १० सप्टेंबर २०२२ (विदर्भ वगळून संपूर्ण महाराष्ट्र) 

४ जुलै २०२२ ते २४ सप्टेंबर २०२२ (विदर्भ) 

सेतू अभ्यासक्रम PDF (bridge course PDF) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा

विद्या प्रवेश - शाळापूर्व तयारी कार्यक्रम उद्बोधन सत्र

See live here 👇वरील कालावधीत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यात यावा.

विद्याप्रवेश- शाळापूर्व तयारी शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

१. सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परिषदेमार्फत सन २०२२-२३ मधील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 'विद्यार्थी कृतिपुस्तिका आणि इयत्ता पहिलीच्या वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी 'शिक्षक मार्गदर्शिका विकसित करण्यात आलेली आहे. सदर साहित्य फक्त शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत मोफत वितरीत करण्यात येत आहे. इतर शाळांच्यासाठी सदर साहित्य PDF स्वरुपात परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. विद्याप्रवेशः शाळा पूर्व तयारी कार्यक्रम शिक्षक मार्गदर्शिकेतील सूचनांनुसार विद्यार्थी कृतिपुस्तिकेचा वापर करण्यात यावा. 

विद्याप्रवेश - शिक्षक मार्गदर्शिका - Click Here

विद्याप्रवेश - विद्यार्थी कृतीपत्रिका - Click Here


२. या कार्यक्रमाव्यतिरिक्त इयत्ता पहिलीसाठी शालापूर्व तयारी संदर्भाने इतर कोणताही अशासकीय कार्यक्रम शाळांमध्ये सुरु करू नये.

३. क्षेत्रीय अधिकारी यांनी शाळा भेटीच्या वेळी या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुयोग्य पद्धतीने होत आहे का? याची पडताळणी करावी व आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे. 

४. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व) यांनी या कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वयासाठी आपल्या कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी "शाळापूर्व तयारी पहिले पाऊल" या कार्यक्रमासाठी नोडल ऑफिसर म्हणून कामकाज पहिले असेल त्याच अधिकाऱ्याची " विद्या प्रवेश: शाळा पूर्व तयारी " या कार्यक्रमासाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करावी. तसेच तालुकास्तरावरही या संदर्भात समन्वयकाची नेमणूक करावी.

५. या कार्यक्रमाचे परिषदेमार्फत / त्रयस्त संस्थेमार्फत अनुधावन करण्यात येईल.


Post a Comment

0 Comments

close