सेतू अभ्यासक्रम 30 दिवस राबविण्यात आला आहे. या सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची (30 दिवसानंतर) विद्यार्थ्यांची अध्ययन स्थितीची तपासणी केली जाणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे. याकरिता राज्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात इयत्ता २ री ते १० वी या इयत्तेतील विद्यार्थ्याची सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्व्हे मंकी लिंकच्या माध्यमातून पूर्व चाचणीद्वारे माहिती संकलन करण्यात आलेली आहे. त्यानुसार या संशोधनासाठी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी एक सर्वेक्षण मंकी लिंकमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
हे सर्वेक्षण डायट चे वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ज्ञ व विशेष शिक्षक यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.
Join WhatsApp Group
हे सर्वेक्षण यापूर्वी पूर्व चाचणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली सोडवून घेण्यात आली होती, त्याच विद्यार्थ्यांची उत्तर चाचणी सोडवून घेण्यात येणार आहे.



0 Comments