Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करणेबाबत

केंद्र शासनाने देशभरात सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून राबविण्याचे ठरविले आहे. या राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 


राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत खालील प्रमाणे कार्यक्रम शाळा/ ग्रामपंचायत/तालुका स्तरावर राबविण्यात यावेत.

1) परसबाग - प्रत्येक शाळेमध्ये परसबागेचे फायदे या विषयाबाबत विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी सत्र आयोजित करणे व ज्या ठिकाणी परबागेसाठी जागेची उपलब्धता आहे तिथे जास्तीत जास्त शाळांमध्ये परसबाग करण्यावर भर देणे.

2) विविध स्पर्धा - शाळा /ग्रामपंचायत/तालुका/जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये स्पर्धा राबवून पोषण आहाराचे तसेच पोषण मुल्याचेही महत्व पटवून देणे, शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करणे.

3) किशोरवयीन मुली जनजागृती -  किशोरवयीन मुलीमध्ये पोषणमुल्य तसेच आरोग्याविषयी प्रश्नाबाबत जनजागृती करणे.

4) चर्चा सत्र - पोषणमुल्याबाबत प्रत्येक शाळा स्तरावर ऑडिओ-व्हिडीओ सत्र तसेच चर्चा सत्र आयोजित करणे.

५) शाळेमध्ये पोषण आहाराबाबत संवेदनशीलता आणण्यासाठी पोषण आहार वेबसाईटवरील ऑडिओ-व्हिडीओचा वापर करणे. (mdm.nic.in main website) 

6) शाळा परिसरात अंगणवाडी केंद्र असल्यास त्यांनाही या उपक्रमामध्ये समाविष्ट करुन घेणे.

7) पाण्याचे महत्व - विद्यार्थ्यामध्ये पाण्याचे महत्व रुजवणे त्याचा वापर व बचत याबाबतची माहिती देणे.

8) पोषण माह अंतर्गत ग्रामपंचायतीचा सहभागातून महिला आणि स्वास्थ चा प्रसार करणे. 

9) ॲनिमिया शिबिर - सर्व तालुक्यांनी मुख्यत्वे अनिमिया शिबिराचे आयोजन करावे व पारंपारिक पाककृतीवर भर द्यावा. 


10) सर्व तालुक्यांनी खालील स्पर्धांचे पोषण माह अंतर्गत नियोजन करावे. सर्व जिल्हयांनी सहभाग नोंदविणे आवश्यक राहील,

अ) अम्मा की रसोई/ आजीचे स्वयंपाकगृह चे आयोजन

ब) तालुक्यांनी त्यांच्या स्थानिक ऋतुमानानुसार उपलब्ध होणाऱ्या धान्यातुन पारंपारिक पाककृती तयार करणे. तसेच सर्व धान्यातील पोषणमुल्यांची ओळख करून देणे.

क) इंद्रधनुष्य थाळी/तिरंगी थाळी स्पर्धेचे आयोजन करणे.

ड) गणपती बाप्पा पोषक थाळी सट चे आयोजन करणे. 

(आ) लायन्स क्लब, रेड क्रास, रोटरी क्लबच्या मदतीने विद्यार्थ्यांचे वाढ मोजमाप चे आयोजन करणे.

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम बाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

११) गावातील सदर विषयाचे तज्ञ व्यक्ती, डॉक्टर व ग्रामपंचायत सभासदांचा या अभियानातील सहभाग निश्चित करण्यात येऊन त्यांचेही मार्गदर्शन घेण्यात यावे. पोषण माह उपक्रम जास्तीत जास्त यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात यावा.

१२) शाळांतर्गत शिक्षक / पालक बैठकी घेण्यात याव्यात.

Post a Comment

0 Comments

close