शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत प्रती वर्षी दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षकपर्व उपक्रम साजरा केला जातो. सन २०२२-२३ साठी शिक्षक पर्व 2022 उपक्रम घेण्याविषयी सूचित करण्यात आले आहे. या अंतर्गत "Demonstration of Innovative Pedagogy for teachers in every school", Item Bank /प्रश्न पेढी निर्मिती, Uploading of Videos on Innovative Pedagogy by the Teacher on Vidya Amrit Portal हे उपक्रम राज्यातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) यांच्या माध्यमातून समन्वयाने संपूर्ण राज्यभर राबवायचे आहेत.
शिक्षक पर्व 2022 रजिस्ट्रेशन - Click Here
प्रश्न निर्मिती टेम्पलेट अपलोड करण्यासाठी लिंक - Click Here
शिक्षक पर्व 2022 बाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
सदर उपक्रम कार्यवाहीबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
उपक्रमः १ नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र (Innovative Pedagogy) दिग्दर्शन सत्र व आंतरक्रियाः उपक्रम पार्श्वभूमी अध्यापनशास्त्र हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा गाभा आहे. तणावमुक्त वातावरणामध्ये अध्ययन घडून यावे यासाठी विविध पद्धतींमागील अध्यापनशास्त्र माहिती असणे आवश्यक आहे. आजपर्यंत व्याख्यान पद्धती. पाठ्यपुस्तक केंद्रित चर्चा व खड्डू फळा यांच्याशी संबंधित पद्धतींचा वापर केला जात आहे. या पद्धती अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी खूप कमी प्रमाणात प्रभावी ठरतात असे बरीच संशोधने सांगतात. परंतु काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या गरजा व संदर्भ यानुसार अध्यापनशास्त्राचा वापर करतात किंवा स्वतः असे अध्यापनशास्त्र विकसित करतात त्यास नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र असे संबोधता येईल.
NEP 2020 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संपूर्ण माहिती - Click Here
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर बदलणाऱ्या अध्ययन अध्यापनाच्या गरजा आणि येणारे नवीन विचार प्रवाह यांचा विचार करून अध्ययनार्थी केंद्रित अध्ययन अध्यापनशास्त्राचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. यादृष्टीने शिक्षकांना अशा नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व त्याचे अध्यापनशास्त्र याविषयी मार्गदर्शन मिळावे आणि प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनामध्ये त्यांचा वापर व्हावा यासाठी सदर उपक्रम राष्ट्रीय स्तरावरून आयोजित करण्यात आला आहे. यावर आधारित Innovative pedagogy या विषयाशी संबंधित स्पर्धांचे आयोजन राष्ट्रीय स्तरावरून करण्यात येत आहे.
उद्देश :
अध्ययनार्थ्याला आनंददायी पद्धतीने त्याच्या गरजांचा विचार करून तसेच त्याच्या सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीचा विचार करून अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्राचा वापर करून बहुविद्याशाखीय सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देणाऱ्या अध्ययन-अध्यापन पद्धतींचे शिक्षकांना ज्ञान व्हावे या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
सत्र आयोजन कालावधी - याबाबतचे पत्र अथवा V. C. द्वारे सूचना मिळाल्यापासून दि. १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रामध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
उपक्रमाची कार्यपद्धती
* सदर उपक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत राबविण्यात येणार आहे.
* याकरिता डायट मार्फत नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित दिग्दर्शन पाठ व आंतरक्रियात्मक सत्र आयोजित करण्यात यावे. सत्राचा कालावधी १ तासाचा असेल.
* सदर सत्रासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील प्राचार्य/ वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता / विषय सहायक हे स्वतः तज्ञ मार्गदर्शक असतील.
* त्याच बरोबर विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, गट साधन व्यक्ती विशेष शिक्षक यांची देखील तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करता येईल.
* सदर उपक्रमाचे सर्व नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात यावे.
* सदर सत्र हे कोणत्याही इयत्तेच्या कोणत्याही विषयाच्या निवडलेल्या घटकावर आधारित असावे.
* तसेच सदर सत्रासाठी नाविन्यपूर्ण आनंददायी तसेच अध्ययनार्थ्याला गुंतवून ठेवणाऱ्या पद्धतींचा वापर करावा.
* सत्र आयोजित करण्यासाठीचे वेळापत्रक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मार्फत तयार करण्यात यावे.
* सर्व तज्ञ व्यक्तीना दिग्दर्शन पाठ तयार करण्याविषयी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत मार्गदर्शन देण्यात यावे. तसेच नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींची माहिती देण्यात यावी. यामध्ये ज्ञानारचनावाद, सहकार्यात्मक अध्ययन, सहाध्यायी अध्ययन, अनुभवात्मक अध्ययन, खेळ आधारित अध्यापनशास्त्र, तंत्रज्ञान अनुदेशित अध्यापन पद्धती, पृच्छा पद्धती, स्वयंअध्ययनास चालना देणाऱ्या अध्यापन पद्धतींचा समावेश असावा. तसेच ज्या अध्ययन निष्पत्तीवर काम करणे आवश्यक आहे (NAS, अध्ययन स्तर निश्चिती यांच्या आधारे अशा अध्ययन निष्पत्तींचा प्रामुख्याने विचार करण्यात यावा.
* त्यानुसार तज्ञ मार्गदर्शकांना नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र संकल्पना, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व त्यामागील अध्यापनशास्त्र, त्यांचा अध्ययन-अध्यापनातील वापर, त्यातून साध्य होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. कोणत्याही एका नाविन्यपूर्ण पद्धतीवर आधारित किमान २० मिनिटे कालावधीचा डेमो घेण्यासाठीचे नियोजन करण्याविषयी सूचना देण्यात याव्या. तज्ञ मार्गदर्शकांनी केलेले पाठ नियोजन एकत्रित करून ठेवावे.
* अधिक माहितीसाठी NCERT यु-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध असणारे व्हिडीओ पहावे.
* सदर नियोजन करीत असताना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या गरजा, निवडण्यात आलेल्या विषयाशी संबंधित अध्यापनशास्त्र यांचाही विचार करावा.
* उपक्रमाचे वेळापत्रक, दिनांक, वेळ व तज्ञ व्यक्तींच्या नावासह किमान तीन दिवस आधी संबंधित तज्ञ मार्गदर्शकांना तसेच ज्या शाळेमध्ये सदर सत्र आयोजित करण्यात येणार आहे त्या शाळेस पुरविण्यात यावे. संबंधित शाळांना याबाबत पूर्वकल्पना देण्यात यावी व सर्व शिक्षक उपस्थित राहतील याची खात्री करण्यात यावी.
* शिक्षक उपस्थितीपत्रक ठेवण्यात यावे.
* ज्या केंद्रामध्ये शिक्षक संख्या कमी आहे अशा केंद्रामध्ये केंद्रातील सर्व शिक्षक एका ठिकाणी एकत्र येतील असे नियोजन करता येईल. सदर सत्राचा व्हिडीओ तयार करून ठेवावा.
* सहभागी शाळामार्फत किंवा शाळेतील शिक्षकांमार्फत किमान चार ते पाच फोटो सत्राविषयीच्या कमाल ५०० शब्दांच्या मर्यादेतील अभिप्राय/ माहितीसह विद्याअमृत पोर्टलवर अपलोड करावयाचे असल्याने याबाबत संबंधित शिक्षक / शाळेस सत्रादरम्यान अवगत करण्यात यावे.
* सदर फोटो व अभिप्राय / माहिती विद्या अमृत पोर्टल वर अपलोड करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. तत्पूर्वी सदर फोटो व अभिप्राय / माहिती शिक्षक नाव, शाळेचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा या तपशीलासह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत एकत्रित करून गुगल ड्राईव्हला अपलोड करून ठेवण्यात यावे.
* सदर फोटो दि. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अपलोड करता येतील.
शाळांची निवड व सत्र नियोजन :
* नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र विषयक दिग्दर्शन पाठ व आंतरक्रिया सत्र हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातील शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळातील (जि.प./नगरपालिका/महानगरपालिका / नगरपरिषद/ आश्रमशाळा / निवासीशाळा / KGBVइ.) शिक्षकांसाठी आयोजित केले जावे..
* त्यामुळे निवडण्यात आलेल्या शाळांच्या संख्येनुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील अधिकारी, विषय साधन व्यक्ती केंद्र साधन व्यक्ती, विशेष शिक्षक यांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी द्यावी.
* निवड करण्यात आलेल्या शाळांची व तज्ञ मार्गदर्शक यांची यादी तयार करून ठेवावी.
* एखादे केंद्र छोटे असेल किंवा शिक्षक संख्या मर्यादित असेल तर साधारण १ ते २ कि.मी. अंतरातील मध्यवती शाळेमध्ये सदर सत्राचे नियोजन करावे.
* केंद्रातील प्रत्येक शासकीय शाळेमध्ये सदर सत्र आयोजित करण्यातील अडचणी पाहता एका केंद्रामध्ये किमान एक व कमाल कितीही सत्र आयोजित करावीत.
* सदर सत्राचे फोटो किंवा व्हिडिओ #innovativepedogogy आणि #scertmaharashtra या हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अपलोड करावेत तसेच SCERT फेसबुक पेज व ट्वीटर हँड्लला टॅग करण्यात यावे. उपरोक्त प्रमाणे करावयाच्या कार्यवाहीबाबतची सर्व आवश्यक माहिती जतन करून ठेवण्यात यादी जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनेनुसार सर्व माहिती विहित कालावधीमध्ये मरणे शक्य होईल. सदर उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी श्रीम. सरस्वती सूर्यवंशी, अभ्यासक्रम विकसन विभाग यांच्याशी संपर्क साधावा. फोन नंबर ९८५०९७७९१२
उपक्रम क्र. २ Item Bank/प्रश्न पेढी निर्मिती
* या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांकडून वेगवेगळ्या विषयातील अध्ययन निष्पत्तींवर आधारित किमान ३ Item / प्रश्न तयार करावयाचे आहेत. सदर प्रश्न mygov या पोर्टलवर शिक्षकांनी अपलोड करावयाचे आहेत. सदर प्रश्न राज्याला प्राप्त होतील. राज्यसरावरून सदर प्रश्नांचे संकलन करून ते शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांना पाठविण्यासंदर्भात निर्देशित करण्यात आले आहे. सदर विषयास अनुसरून खालील प्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे.
* सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा / शिक्षक वेगवेगळ्या विषयातील अध्ययन निष्पत्तीवर आधारीत किमान तीन प्रश्न तयार करतील. तयार करण्यात आलेले Item / प्रश्न https://innovateindia.mygov.in/shikshak pary-२०२२ / या पोर्टलवर टेम्प्लेट अपलोड करतील,
* शिक्षकांनी अपलोड केलेले Item / प्रश्न राज्याला केंद्रसरकार कडून राज्याला प्राप्त होतील. राज्यस्तरावर जिल्हानिहाय प्रश्न जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठविण्यात येतील.
* जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी CRC निहाय item/ प्रश्न CRC यांना उपलब्ध करून द्यावयाचे आहेत.
* CRC स्तरावर Item / प्रश्न प्रत्येक स्तरनिहाय प्रत्येकी ३ प्रश्न (कोणतेही विषय) या प्रमाणे एकूण १२ चांगले item/ प्रश्न निवडून ते BRC ला पाठवावयाचे आहेत. BRC या प्राप्त १२ प्रश्नातून खालीलप्रमाणे स्तरनिहाय १ याप्रमाणे ४ प्रश्न निवडून ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याकडे पाठवतील. मुंबई शहर व उपनगर यांचे बाबतीत मात्र प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांना पाठवतील.
* जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) किंवा प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या त्यांच्याकडे आलेली Item / प्रश्न संकलित करून राज्य स्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडे मूल्यमापन विभागास evaluationdent@maa.ac.in या मेलवर पाठवतील.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडे प्राप्त झालेले सर्व Item / प्रश्न शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालय, नवी दिल्ली यांना पाठविण्यात येतील. शिक्षण मंत्रालयामार्फत उत्तम प्रश्न निवडले जातील व NCERT, नवी दिल्ली यांचे मार्फत ज्या शिक्षकांचा Item / प्रश्न उत्तम म्हणून निवडला जाईल, त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
* सद्यस्थितीमध्ये शाळा / शिक्षक यांचेमार्फत Item / प्रश्न पोर्टल वर अपलोड करण्याविषयीची कार्यवाही दि. १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करावयाची आहे.
• १ पायाभूत स्तर (इयत्ता १ ली ते २ री) (Foundational Stage)
• २ पूर्वतयारी स्तर ( इयत्ता ३ री ते ५ वी) (Preparatory Stage)
• ३ मध्यस्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी) (Middle Stage)
• ४ माध्यमिक स्तर (इयत्ता ९ वी ते १२ वी ) (Secondary Stage)
* जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था / प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई- प्रश्न/ Item निवड जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)/ प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे प्रत्येक BRC / URC कडून वरील प्रमाणे ४ Item / प्रश्न याप्रमाणे संकलन करावे. सर्व जिल्ह्यांचे item / प्रश्न एकत्रित करून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना पाठवावेत. उदा. एका जिल्ह्यात १५ BRC व URC असेल तर स्तरानिहाय एकूण ६४ Item / प्रश्न संकलित होतील..
* CRC BRC व DIET स्तरावर ४ Item / प्रश्न निवड / संकलन कालावधी याबाबत यथावकाश कळविण्यात येईल. NCERT, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सुचनानुसार विहित नमुन्यात शिक्षकांनी प्रश्न तयार करावेत व नमूद कालावधीत पोर्टलवर अपलोड करण्याबाबत BRC व CRC यांना कळविण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे. Item Bank / प्रश्न पेढी या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी श्री. महादेव वांडरे, उपविभागप्रमुख, मूल्यमापन विभाग ( ९५७९८०३४६०) व श्रीम. स्वाती पेटकर, अधिव्याख्याता (८९९९४६८८६६) यांचेशी संपर्क साधावा.
0 Comments