शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना ग्राह्य धरावयाच्या शैक्षणिक अर्हतेविषयीचा संभ्रम आता दूर झाला आहे. शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देतांना उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुकंपा तत्वाने शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देतांना संबंधित उमेदवारास शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यांस सवलत राहील किंवा कसे याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे अभिप्राय घेण्यात आले होते. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने (शालेय शिक्षण) पुढील प्रमाणे अभिप्राय दिले आहेत.
"प्राथमिक शिक्षक पदासाठी TET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. दि. २०.१.२०१६ च्या शासन निर्णयाने उद्भवलेली त्रुटी दूर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षकांची अर्हता NCERT ने निश्चित केली असून तिचे पालन करणे बंधनकारक आहे. सबब इतर बाबींसोबत अनुकंपा नियुक्ती देतांना उमेदवार TET उत्तीर्ण असण्याची दक्षता घेण्यात यावी."
प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत शासन निर्णय 02 सप्टेंबर 2024 - Click Here
प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना 3 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत शासन निर्णय 02 सप्टेंबर 2024 - Click Here
शासन शुद्धिपत्रक
प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना 5 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत शासन निर्णय 23 सप्टेंबर 2024 - Click Here
शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देतांना उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत चे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
पदभरती शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 डाउनलोड करा. Click Here
0 Comments