Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

'सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती 2023' आणि 'ओक संशोधन पाठ्यवृत्ती 2023' साठी अर्ज करण्याचे आवाहन

संशोधन पर कामासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता दिल्या जाणाऱ्या 'सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती' आणि 'ओक संशोधन पाठ्यवृत्ती' साठी अर्ज करण्याचे आवाहन 'सकाळ इंडिया फाउंडेशन' ने केली आहे. 

कोणत्याही क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना दरवर्षी सकाळ इंडिया फाउंडेशनची शिष्यवृत्ती देण्यात येते, तर हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, जैवतंत्रज्ञान व कुक्कुटपालन तसेच मायक्रोबायलॉजी, झूलॉजी, बॉटनी व बायोकेमिस्ट्री या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांना 'दामोदर माधव ओक' व 'सुधा दामोदर ओक' यांच्या नावाने पाठ्यवृत्ती देण्यात येते. 

सकाळ चित्रकला स्पर्धा 2023 निकाल - Click Here


'सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती 2023' आणि 'ओक संशोधन पाठ्यवृत्ती 2023' साठी अर्ज कोणाला करता येईल? 

महाविद्यालये, विद्यापीठे किंवा तत्सम संशोधन संस्थांमध्ये संशोधन करणारे विद्यार्थी व शिक्षक यासाठी अर्ज करू शकतील. 


निवड झालेल्या संशोधकांना शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्ती म्हणून संशोधनावर होणाऱ्या खर्चापोटी प्रत्येकी ५० हजार रुपये दोन समान हप्त्यात देण्यात येतील. संशोधन प्रकल्पाच्या पहिल्या वर्षातील प्रगतीचे तज्ज्ञांमार्फत अवलोकन केल्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी तेवढीच रक्कम मंजूर करण्याबाबत विचार होईल.

सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती 2023 नोंदणी - Click Here


'सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती 2023' आणि 'ओक संशोधन पाठ्यवृत्ती 2023' साठी अर्ज पाठविण्याचा पत्ता

शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तीच्या छापील अर्जासाठी इच्छुकांनी विनंती पत्रासोबत संशोधन नोंदणी पत्र तसेच दहा रुपयांचे टपाल तिकीट लावलेले व स्वतःचे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता लिहिलेले पाकीट पुढील पत्त्यावर पाठवावे. 

'सकाळ इंडिया फाउंडेशन, प्लॉट नं २७, नरवीर तानाजीवाडी, पीएमपी डेपोजवळ, साखर संकुलजवळ, शिवाजीनगर, पुणे ४११००५. '


विनंती अर्ज १५ फेब्रुवारी २०२३ तारखेपर्यंत पाठवावेत. संपूर्ण भरलेले अर्ज २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत स्वीकारण्यात येतील. अर्जांची छाननी व आवश्यकतेनुसार इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर 'सकाळ इंडिया फाउंडेशन' शिष्यवृत्ती' साठी दोन आणि 'ओक संशोधन पाठ्यवृत्ती' साठी दोन, अशा चार संशोधकांची निवड करण्यात येईल.


अधिक माहितीसाठी संपर्क :

(०२०) २५६०२१०० ( Ext १७४), ६६२६२१७४. 

ई-मेल : contactus@sakalindiafoundation.org

sakalindiafoundation@esakal.com

Post a Comment

0 Comments

close