संच मान्यता पोस्ट मॅपींग पश्चात उच्चतम मंजूर पदाच्या मर्यादेत वेतन आहरित करणेबाबत शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य 9 मे 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
या वर्षीची संचमान्यता डाउनलोड करा. Click Here
शालार्थ वेबसाइट
https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
राज्यातील माध्यमिक शाळांच्या (अनुदानित/अंशतः अनुदानित) सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यता आधारे पोस्ट मॅपींग प्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यानुसार NIC कडील संचमान्यता API चा वापर करून संचमान्यता व शालार्थ प्रणाली यांचे Interpetition करून शालार्थ प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे. जेणेकरून संचमान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन आहरित होणार नाही.
यासंदर्भात माध्यमिक शाळांमधील पोस्ट मॅपींग कामकाज माहे जून वेतन पेड ईन जूलै २०२५ पूर्वी पूर्ण करावे. तसेच उच्च माध्यमिक (अनुदानित/अंशतः अनुदानित) शाळांच्या संचमान्यतेची शालार्थ प्रणालीवर नोंद करण्याची व या संचमान्यता PDF स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उच्च माध्यमिक शाळांच्या संचमान्यता आधारे शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेमध्ये उच्चतम मान्य पदापेक्षा अधिक पदांचे वेतन आहरित होणार नाही यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. करीता उच्च माध्यमिक शाळांचे जूलै वेतन पेड ईन ऑगस्ट २०२५ पूर्वी संचमान्यता पोस्ट मॅपिंग व संचमान्यता PDF स्वरूपात अपलोड करणे ही कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा उपरोक्त प्रमाणे नमूद महिन्याचे वेतन शालार्थ प्रणालीवरून अदा करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
0 Comments