Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

SLAS Survey Exam in maharashtra Schools 2023 | 'स्लॅस' सर्वेक्षण - शिक्षक संपांमुळे 'स्लॅस' सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आले

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (स्लॅस) शिक्षण विभागातर्फे 24 मार्च 2023 रोजी करण्यात आले. 

SLAS Survey Question Papers अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नसंच

राज्यात तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे 'स्लॅस'चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात येणार होते. हे सर्वेक्षण हे मराठी माध्यमाच्या प्रथम भाषा मराठी गणित या विषयांचे करण्यात येणार आहे. राज्यभरातील इयत्ता तिसरीच्या ३ हजार ७५६, पाचवीच्या ४ हजार ५० तर आठवीच्या ४ हजार १२७ शाळांमध्ये स्लॅस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यातील एकूण ११ हजार ९३३ शाळांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाच्या अनुषंगाने निवडण्यात आलेल्या शाळेचा पट, माध्यम यांची पडताळणी करून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, मनपा स्तरावर शिक्षणाधिकारी आणि संबंधित तालुका समन्वयक यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

राज्यस्तरावरून 10 ते 13 मार्च दरम्यान आवश्यक साहित्य वितरित करण्यात आलेले आहे. साहित्य जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आलेले आहे. याबाबतची आवश्यक पूर्वतयारी जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत करण्यात आलेली आहे.


मात्र दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यातील बरेच शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपावर गेलेले आहेत. राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण (SLAS) साठी क्षेत्रीय अन्वेषक (FI) म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबत प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची दिनांक १५ मार्च २०२३ रोजी ऑनलाईन बैठक घेतली असता बरेच शिक्षक संपावर असल्याने सांगण्यात आले. तसेच बऱ्याच शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी नसल्याचे सांगण्यात आले. सदर बाबीचा विचार करता सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यामध्ये अडचणी येवू शकतात असे सांगण्यात आलेले आहे. यामुळे दिनांक १७ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिनांक १७ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणारे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण सदर दिवशी होणार नाही. सर्वेक्षणाची पुढील दिनांक आपणास यथावकाश कळविण्यात येईल. याबाबत जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक, क्षेत्रीय अन्वेषक, मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात यावे.

SLAS survey 2023 दिनांक बाबत चे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close